...अन् साखरपुड्यावरुन परतलेल्या वऱ्हाड्यांनी घातला भररस्त्यात ठिय्या!

ट्रक वाहनचालक व टॅंकर वाहनचालक हाणामारी.jpg
ट्रक वाहनचालक व टॅंकर वाहनचालक हाणामारी.jpg

नाशिक : (मालेगाव) मनमाड - मालेगाव रस्त्यावरील कुंदलगाव शिवारात ट्रकला कट मारल्याच्या वादातून, ट्रक व टॅंकरचालकांमध्ये झालेल्या बाचाबाचीचे पर्यवसान ट्रकमधील वऱ्हाडींना रस्त्यात चोंढी शिवारात ट्रक अडवून लोखंडी पाइप व लाठ्याका ठ्यांनी मारहाण केली. यात सात जण जखमी झाले.

असा आहे प्रकार

रविवारी (ता. 16) मध्यरात्री बाराच्या सुमारास हा प्रकार घडला. शहरातील कमालपुरा येथील कमरुद्दीन हाजी शमसुद्दीन शेख यांच्या मुलाचा साखरपुडा येवला येथील मुशीर शेख यांच्याकडे होता. हा कार्यक्रम आटोपून ते आप्तेष्टांसह मालेगावी येत असतांना कुंदलगावजवळ टॅंकर (एमएच 18, एए 9367) हॉटेल गुरुकृपासमोरून अचानक रस्त्या वर आला. ट्रक (एमएच 18, एए 6414)चा कट लागल्याने चालक मोहंमद हनीफ व टॅंकरचालक सुनील चोरमले यांच्यात वाद झाला. काहींनी सोडवासोडव करून वाद मिटवला. यानंतर सुनीलने फोन करून काहींना बोलवून घेतले. त्यांनी चोंढीजवळ ट्रक अडवून चालकासह महिलांना मारहाण केली. मोबाईलसह पाच ग्रॅमच्या सोन्या ची पोत व सात हजार रुपयांची रोकड असा 40 हजारांचा ऐवज हिसकावून घेतला. या घटनेच्या निषेधार्थ व मारहाण करणाऱ्यांना अटक करावी, या मागणीसाठी वऱ्हाडींनी सामाजिक कार्यकर्त्यांसह रस्त्यावर ठाण मांडले. यामुळे तासभर वाहतूक विस्कळित झाली.

पाच संशयितांना अटक

यात हलीमा अहमद, जुबैदा मोहंमद, एजाज अहमद, मोहंमद हनीफ, निसार अहमद, मोहंमद इब्राहिम हे जखमी झाले. पोलिसांनी वऱ्हाडींची समजूत काढल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. तालुका पोलिस ठाण्यात या प्रकरणी मोहंमद हनीफ अमीर (वय 36, रा. कमालपुरा) याच्या तक्रारीवरून मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी मारहाण प्रकरणी सुनील चोरमले (30), किरण चोरमले (34), विशाल चोरमले (20), शरद चोरमले (33), गणेश चोरमले (21, सर्व रा. चोंढी शिवार) या पाच संशयितांना अटक केली.

ही बातमी शहरात कळताच सामाजिक कार्यकर्ते घटनास्थळी पोचले. त्यांनी वऱ्हाडींसह रस्त्यावर ठाण मांडले. घटनेची माहिती समजताच उपअधीक्षक रत्नाकर नवले, पोलिस निरीक्षक नरेंद्र भदाणे यांच्यासह सहकारी घटनास्थळी पोचले. त्यांनी वऱ्हाडींची समजू त काढली. यानंतर वऱ्हाडींनी रास्ता रोको मागे घेतला. तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयितांना अटक केली.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com