esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

sinner accident 1.png

नाशिक जिल्ह्याच्या सीमा बंद आहेत. सीमाभागात ग्रामीण पोलीसांनी चेकपोस्ट उभारल्या असून या ठिकाणाहून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी केली जाते. अपुऱ्या पोलीसांच्या मनुष्यबळाामुळे काही शिक्षकांना या ठिकाणी ड्युटी देण्यात आली आहे. आणि त्यात अशी एक घटना घडली ज्यात शिक्षकाचा जीव धोक्यात आला.

अपुऱ्या पोलीसांच्या मनुष्यबळामुळे शिक्षकाला चेकपोस्टवर लावली ड्युटी.. अन् चेकपोस्टवरच मोठा अपघात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक / सिन्नर : नाशिक जिल्ह्याच्या सीमा बंद आहेत. सीमाभागात ग्रामीण पोलीसांनी चेकपोस्ट उभारल्या असून या ठिकाणाहून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी केली जाते. अपुऱ्या पोलीसांच्या मनुष्यबळाामुळे काही शिक्षकांना या ठिकाणी ड्युटी देण्यात आली आहे. आणि त्यात अशी एक घटना घडली ज्यात शिक्षकाचा जीव धोक्यात आला.

अशी घडली घटना

नाशिक जिल्ह्याच्या सीमा बंद आहेत. सीमाभागात ग्रामीण पोलीसांनी चेकपोस्ट उभारल्या असून या ठिकाणाहून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी केली जाते. अपुऱ्या पोलीसांच्या मनुष्यबळाामुळे काही शिक्षकांना या ठिकाणी ड्युटी देण्यात आली आहे. यानुसार सिन्नर तालुक्यातील पाथरे येथील सुनील डुकरे हे या ठिकाणी कर्तव्य बजावत होते. याच वेळी रात्री नऊ नाजेच्या सुमारास कोपरगावावरून येणारा गॅस सिलेंडरचा ट्रक त्यांच्या तंबूत शिरला. याच वेळी डुकरे याठिकाणी उभे होते. तर इतर कर्मचारी त्यांच्यापासून काही अंतरावर असल्याने मोठा अनर्थ टळला.

ट्रकवरील ताबा सुटल्याने अपघात

अपघातात जखमी डुकरे यांना सिन्नर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर त्यांना नाशिक येथे हलविण्यात आल्याची माहिती मिळत आहे. 
दरम्यान ट्रकचालक मद्यपान केलेला होता. त्यामुळे ट्रकवरील त्याचा ताबा सुटल्याने अपघात घडल्याची माहिती वावीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी दिली आहे.

हेही वाचा > "रेड झोन' आला आडवा...विवाहितेचा मुलासह आत्महत्येचा निर्णय..त्यावर वडिलांची युक्ती सफल!

शिक्षक गंभीर जखमी

सिन्नर तालुक्यातील पाथरे येथील जिल्हा नाकाबंदी कर्तव्यावर असलेले शिक्षक अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. चेकपोस्टवर त्यांची ड्युटी असतानाच महामार्गावरून भरधाव आलेले ट्रक थेट नाकाबंदी नजीक असलेल्या तंबूत शिरला. या घटनेत वावी (ता.सिन्नर) येथील शिक्षक सुनील बबनराव डुकरे हे गंभीर जखमी झाले आहेत. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक! घरी लग्नाची धामधूम...अन् हळदीच्याच दिवशी प्रेमीयुगुलाला अग्निडाग..पित्यावर दुर्दैवी प्रसंग..​

go to top