आता 'हे' दहा दिवस रात्री बारा पर्यंत बिनधास्त वाजवा!

सकाळ वृत्तसेवा 
Thursday, 13 February 2020

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या ध्वनिप्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियमानुसार श्रोतृगृहे, सभागृहे, सामूहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यांसारख्या बंदिस्त जागांखेरीज इतर ठिकाणी सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत ध्वनिवर्धक वापरण्याची परवानगी देण्यात आली होती. या नियमांत 11 ऑक्‍टोबर 2002 ला सुधारणा करण्यात आली. ध्वनिप्रदूषणाची पातळी विहित मर्यादेत राखून रात्री दहाऐवजी बारा वाजेपर्यंत ध्वनिवर्धक वापरण्यास परवानगी देण्यात आली.

नाशिक : ध्वनिप्रदुषण रोखण्यासाठी विविध कार्यक्रम, सण उत्सवांसाठी मोकळया जागेत एका वर्षात पंधरा दिवस ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरण्याची मुभा दिली जाते. त्यानूसार जिल्हाधिकारयांना प्राप्त अधिकारानूसार वर्षातील दहा दिवस आवाजाच्या पातळीची मर्यादा राखून सकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत ध्वनीक्षेपक वापराची परवानगी राहणार आहे. गणेशोत्सव, नरात्रोत्सव, दिवाळी, ईद आदि सण उत्सवात रात्री बारा पर्यंत वाद्य वाजविता येणार आहे. 

रात्री दहाऐवजी बारा वाजेपर्यंत परवानगी

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या ध्वनिप्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियमानुसार श्रोतृगृहे, सभागृहे, सामूहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यांसारख्या बंदिस्त जागांखेरीज इतर ठिकाणी सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत ध्वनिवर्धक वापरण्याची परवानगी देण्यात आली होती. या नियमांत 11 ऑक्‍टोबर 2002 ला सुधारणा करण्यात आली. ध्वनिप्रदूषणाची पातळी विहित मर्यादेत राखून रात्री दहाऐवजी बारा वाजेपर्यंत ध्वनिवर्धक वापरण्यास परवानगी देण्यात आली. एका वर्षांत फक्त पंधरा दिवसांसाठी ही मान्यता देण्यात आली. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने 10 ऑगस्ट 2017 च्या अधिसूचनेद्वारे या नियमांत सुधारणा करीत, खुल्या जागेत विविध कार्यक्रम, सण-उत्सवांसाठी सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरासाठी परवानगी देण्याची जबाबदारी राज्य शासनाबरोबरच जिल्हाधिकारी व पालिका आयुक्त यांच्यावर सोपविली. त्यानुसार बंदिस्त जागा सोडून खुल्या जागेत एका वर्षांत 1 जानेवारी ते 31 डिसेंबर या कालावधीत पंधरा दिवस निश्‍चित करून त्याची आगाऊ यादी जाहीर करायची आहे. त्यानूसार जिल्हाधिकारयांना प्राप्त अधिकारानूसार दहा दिवसांसाठी रात्री बारापर्यंत लाउडस्पिकर वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. 

हेही वाचा > नवविवाहितेला मुंबईत विकायचा डाव...नवरा अन् पहिल्या बायकोची काळी कृत्ये!

या दिवशी रात्री उशिरापर्यंत असेल परवानगी 
शिवाजी महाराज जयंती 19 फेब्रुवारी 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती 14 एप्रिल 
गणेशोत्सव 31 ऑगस्ट (गणेश आरास पाहण्यासाठी ) 
1 सप्टेंबर (गणेश विसर्जन मिरवणूक) 
नवरात्रोत्सव 24 ऑक्‍टोबर (दुर्गाष्टमी) 
25 ऑक्‍टोबर (दसरा) 
ईद ए मिलाद 31 ऑक्‍टोबर 
दिवाळी 14 नोव्हेंबर 
ख्रिसमस 25 डिसेंबर 
नववर्ष स्वागत 31 डिसेंबर  

हेही वाचा > PHOTOS : भयंकर! मुलीच्या हट्टासमोर आई अखेर हतबल..अन् कायमचीच...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ten days in a year can Play soundtracks at night for twelve o,clock Nashik Marathi News