रात्रीचा 'तिचा' प्रवास...उद्यानात दारूच्या पार्ट्या रंगताना 'ते' तिला बघतात..अन् मग....

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 2 January 2020

दारू पिण्यासाठी कुठला अतिरिक्त कर नाही, कुठला परवाना नाही. दारूसोबत गांजाचा वापर करीत ठिकठिकाणच्या उद्यानात कडाक्‍याच्या थंडीच्या जोरात पार्ट्या सुरू आहेत.मोकळ्या उद्यानात मद्यपींच्या पार्ट्यां जोरात सुरू आहेत. त्यामुळे घराजवळच्या उद्यानापासून फिरतांना महिला सुरक्षित नाहीत. नवीन वर्षाच्या पार्ट्यांच्या निमित्ताने शहरातील उद्यानात टवाळखोरांच्या पार्ट्यांना दोन दिवस आधीपासूनच ऊत आला आहे.

नाशिक : रात्रीचा प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या शहर पोलिसांच्या निर्भया पथकाच्या कारवायांचा धडाका सुरू असला तरी शहरातील बेवारस असलेल्या तीनशेहून आधिक महापालिकेच्या मोकळ्या उद्यानातील टवाळखोर मद्यपी मात्र मोकाटच आहेत. महिला केवळ बसस्थानक, रस्त्यावरच असुरक्षित नसून शहरभरातील उद्यानात वेगळे चित्र नाही. त्यामुळे निर्भया पथकांचा मद्यपी टवाळखोरांकडे कधी मोर्चा वळणार? हा प्रश्‍नच आहे.

पथकाने जरा इकडेही लक्ष देण्याची मागणी 

सगळीकडे नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्ट्यांचे नियोजन जोरात सुरू असताना शहरात महापालिकेच्या मोकळ्या उद्यानात मद्यपींच्या पार्ट्यां जोरात सुरू आहेत. त्यामुळे घराजवळच्या उद्यानापासून फिरतांना महिला सुरक्षित नाहीत. नवीन वर्षाच्या पार्ट्यांच्या निमित्ताने शहरातील उद्यानात टवाळखोरांच्या पार्ट्यांना दोन दिवस आधीपासूनच ऊत आला आहे. दारू पिण्यासाठी कुठला अतिरिक्त कर नाही, कुठला परवाना नाही. दारूसोबत गांजाचा वापर करीत ठिकठिकाणच्या उद्यानात कडाक्‍याच्या थंडीच्या जोरात पार्ट्या सुरू आहेत. 

हेही वाचा > संशयिताला पकडताना झाली झटापट...त्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षकाचेच मात्र....

निर्भयाच्या कारवाया... 
एका बाजूला महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया पथकांच्या कारवाया सुरू आहेत. भुसावळ येथून आलेल्या आजीला तिच्या घराचा पत्ता सापडत नव्हता. याबाबत नियंत्रण कक्षाला कॉल आल्यानंतर निर्भया पथक क्रमांक चारचे अधिकारी व कर्मचारी यांनी मालधक्का गाठले. तेथे असलेल्या आजीला घराचा पत्ता सांगता येत नव्हता. अखेर आजीच्या मुलाचे नाव व पत्ता शोधून आजीला सातपूरमधील श्रमिकनगर येथे सुखरूप पोचविले. नाशिक रोडला मालधक्का परिसरात भुसावळहून आलेल्या आजीला त्यांच्या घराचा पत्ता सापडत नव्हता. त्यामुळे कुणीतरी नियंत्रण कक्षाला माहिती कळवली. तेथून आलेल्या निर्भया पथक क्रमांक चारच्या पथकाने आजीच्या मुलाला भुसावळला संपर्क साधून श्रमिकनगर (सातपूर) येथे राहणाऱ्या लहान मुलाशी संपर्क साधून आजीला श्रमिकनगरला सुखरूप पोचवले. 

हेही वाचा >  छतावरुन आत्महत्या करण्यासाठी पाऊल पुढे टाकणार....तेवढ्यातच.. 

हेही वाचा > अखंड हरिनाम सप्ताह सुरू होता...जोरदार आवाज झाला.. ग्रामस्थांनी पाहिल्यावर धक्काच....

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: woman safety campaign by nashik police crime marathi news