esakal | महत्वाची बातमी : दहावी, बारावी निकालाबाबत अनिश्‍चितता कायम!
sakal

बोलून बातमी शोधा

results.jpg

इयत्ता दहावी, बारावीच्या निकालासंदर्भातील तारखांची अफवा सध्या सोशल मीडियाद्वारे पसरविली जात आहे. परंतु राज्यातील काही विभागांतील उत्तरपत्रिका तपासणीसह अन्य प्रक्रिया पूर्ण झालेली नसल्याने निकालाच्या तारखेबाबत अनिश्‍चितता कायम आहे.

महत्वाची बातमी : दहावी, बारावी निकालाबाबत अनिश्‍चितता कायम!

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नाशिक : इयत्ता दहावी, बारावीच्या निकालासंदर्भातील तारखांची अफवा सध्या सोशल मीडियाद्वारे पसरविली जात आहे. परंतु राज्यातील काही विभागांतील उत्तरपत्रिका तपासणीसह अन्य प्रक्रिया पूर्ण झालेली नसल्याने निकालाच्या तारखेबाबत अनिश्‍चितता कायम आहे. दरम्यान, नाशिक विभागातर्फे यापूर्वीच बारावीची प्रक्रिया पूर्ण केली असून, गुरुवार (ता. 18)पर्यंत दहावीचीही प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे संकेत नाशिक विभागीय परीक्षा मंडळाकडून देण्यात आले. 

विद्यार्थ्यांसह पालक वर्गाकडून प्रतीक्षा

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालासंदर्भात विद्यार्थ्यांसह पालक वर्गाकडून प्रतीक्षा केली जात आहे. परंतु कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत निकालाच्या प्रक्रियेवर गंभीर परिणाम केले आहे. राज्यात एकाच वेळी निकाल जाहीर केला जात असतो. त्यामुळे सर्व विभागाची मूल्यांकनाची प्रक्रिया व गुणपत्रिकांची छपाईप्रक्रिया पूर्ण होणे आवश्‍यक असते. सद्यःस्थितीत इयत्ता बारावीची नाशिक विभागाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. नाशिक विभागात नाशिकसह धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्यांचा समावेश आहे. या सर्व जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाची प्रक्रिया झालेली आहे. 

हेही वाचा > अंधश्रध्देचा खेळ आणि राज्यस्तरीय रॅकेटचा पर्दाफाश..मुंबईतील पोलिस अधिकाऱ्यासह १९ जण सामील

इयत्ता दहावीचा इतिहास विषयाची लेखी परीक्षा उशिराने झाल्यामुळे केवळ या पेपरशी निगडित प्रक्रिया पूर्ण होणे बाकी होती. नाशिक विभागाची इयत्ता दहावीची संपूर्ण प्रक्रिया गुरुवारपर्यंत पूर्णत्त्वास येईल. परंतु कोरोनामुळे प्रभावित झालेल्या राज्यातील अन्य काही विभागांची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसल्याने निकालाच्या तारखेबाबत अनिश्‍चितता कायम आहे.  

हेही वाचा > भुजबळ संतापले...अधिकाऱ्यांना घेतले फैलावर...नेमके काय घडले?

go to top