
नाशिक / चांदवड : शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये इंडियन ऑइल कंपनीच्या पेट्रोल- डिझेल वाहतूक करणाऱ्या ट्रँकरमधून पेट्रोल- डिझेलची चोरी होत असल्याची माहिती चांदवडच्या पोलिस निरीक्षकांना मिळाली. त्यानंतर...
असा घडला प्रकार
गुंजाळ वस्ती येथील शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये इंडियन ऑइल कंपनीच्या पेट्रोल- डिझेल वाहतूक करणाऱ्या ट्रँकरमधून पेट्रोल- डिझेलची चोरी होत असल्याची माहिती चांदवडच्या पोलिस निरीक्षकांना मिळाली. या माहितीवरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक हिरालाल पाटील, हवालदार कैलास जगताप, विजय जाधव, अरुण डोंगरे, चंद्रकांत पवार, एस. आर. मोरे आदींनी सापळा रचला. या वेळी टॅंकरमधून चोरी होताना त्यांनी दोघांना पकडले. या वेळी संशयित हा टँकरचालक असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याप्रकरणी पोलिसांनी शेख मेहबूब शेख सिकंदर (३८, रा. औरंगाबाद) व राजेंद्र गुंजाळ (३९, रा. रायपूर) यांना ताब्यात घेतले. टॅंकरचा क्लिनर विकी पारधी फरारी आहे.
पाच दिवसांची पोलिस कोठडी
तालुक्यातील रायपूर शिवारातील गुंजाळ वस्ती येथे इंडियन ऑइल कंपनीच्या पेट्रोल आणि डिझेलची वाहतूक करणाऱ्या टँकरमधून इंधनाची चोरी करणाऱ्या चालकासह एकास पोलिसांनी पकडले. या दोघा संशयितांकडून चांदवड पोलिसांनी १६ लाख ३५ हजार ९१७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दोघा संशयितांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.