काय बोलावं आता! जेव्हा न्यायाधिशांच्याच घरी होते चोरी; मुळासकट पुरावे नष्ट

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 4 November 2020

ऐकावे ते नवलच...जेव्हा न्यायाधीशाच्या घरीच होते चोरी तर सामान्यांची बात काय. चोरट्यांची शिफारत तर अशी की थोडा सुद्धा पुरावा न ठेवता कारनामा केला. वाचा काय घडले?

नाशिक : ऐकावे ते नवलच...जेव्हा न्यायाधीशाच्या घरीच होते चोरी तर सामान्यांची बात काय. चोरट्यांची शिफारत तर अशी की थोडा सुद्धा पुरावा न ठेवता कारनामा केला. वाचा काय घडले?

अशी आहे घटना

रविवारी (ता. २) मध्यरात्रीची वेळ...गंगापूर रोड परिसरातील मुख्य न्यायाधीशांच्या बंगल्याचा आवारात चोरट्यांनी प्रवेश केला. चोरट्यांनी सुमारे ८ फुट उंचीचे व १० इंच व्यासाचे चंदनाचे झाडाचे खोड बुंध्यापासून तोडून लंपास केले. शहरातील पोलीस अधीक्षकांचा बंगला व पोलीस अकादमीच्या आवारातून चोरट्यांनी चंदनाची झाडे लंपास केली आहेत. पोलिसांसह शासकीय अधिकार्‍यांच्याच घरी चोरी केली जात असल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक परदेशी करत आहेत.

हेही वाचा > धक्कादायक! रक्षकच जेव्हा भक्षक बनतो तेव्हा; पोलिस पतीसह पाच जणांकडून पत्नीचा छळ

जिल्ह्यात चोरीच्या घटनांचे प्रमाण वाढत आहे. चोरांमुळे नागरिक हैराण झाले असून योग्य ती उपाययोजना करणे आवश्यक आहे. नाशिक जिल्ह्यात चंदन चोरीचे प्रमाण वाढत असून, चोरट्यांनी शासकीय अधिकार्‍यांची निवास्थाने व कार्यालयाच्या आवारातील चंदनाच्या झाडांना लक्ष केले आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी शिवाजी आहेर यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

हेही वाचा >  ह्रदयद्रावक! अखेरच्या क्षणीही मैत्रीचा घट्ट हात कायम; जीवलग मित्रांच्या एकत्रच निघाल्या अंत्ययात्रा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Theft sandalwood from premises of judges bungalow nashik marathi news