esakal | मध्यरात्री पेट्रोलपंपावर घडला 'धक्कादायक' प्रकार...सकाळी खुलासा होताच कर्मचाऱ्यांना धक्काच
sakal

बोलून बातमी शोधा

petrol-pump.jpg

शेमळी येथे श्रीराज पाटील यांचा इंडियन ऑइल कंपनीचा पेट्रोलपंप आहे. सोमवारी रात्री अकरापर्यंत पेट्रोलपंपावर कर्मचारी होते. पंप बंद केल्यावर ते पंपावरील खोलीत झोपी गेले. कर्मचारी झोपी जाताच पेट्रोलपंपावर मध्यरात्रीच घडला धक्कादायक प्रकार..सकाळी कळताच कर्मचाऱ्यांना धक्काच!

मध्यरात्री पेट्रोलपंपावर घडला 'धक्कादायक' प्रकार...सकाळी खुलासा होताच कर्मचाऱ्यांना धक्काच

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक / सटाणा : शेमळी येथे श्रीराज पाटील यांचा इंडियन ऑइल कंपनीचा पेट्रोलपंप आहे. सोमवारी रात्री अकरापर्यंत पेट्रोलपंपावर कर्मचारी होते. पंप बंद केल्यावर ते पंपावरील खोलीत झोपी गेले. कर्मचारी झोपी जाताच पेट्रोलपंपावर मध्यरात्रीच घडला धक्कादायक प्रकार..सकाळी कळताच कर्मचाऱ्यांना धक्काच!

काय घडले नेमके?
शेमळी येथे श्रीराज पाटील यांचा इंडियन ऑइल कंपनीचा पेट्रोलपंप आहे. सोमवारी रात्री अकरापर्यंत पेट्रोलपंपावर कर्मचारी होते. पंप बंद केल्यावर ते पंपावरील खोलीत झोपी गेले. रात्री उशिरा डिझेलची चोरी झाली. सकाळी कर्मचारी कामावर आल्यानंतर मीटर रीडिंग देत असताना, रीडिंगचा ताळमेळ बसत नसल्याने पेट्रोलपंपमालकांना बोलावण्यात आले. सुमारे तीन लाख रुपयांच्या चार हजार लिटर डिझेलची चोरी झाल्याचे आढळून आले. याबाबत सटाणा पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. मध्यरात्री सीसीटीव्हीमध्ये काही व्यक्ती संशयित हालचाली करताना आढळून आल्याने व काही अंतर डिझेल वाहून नेल्याचे आढळल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, पेट्रोलपंपावर रात्री मुक्कामी असलेली गाडी इंडियन ऑइल कंपनीचे बॅनर लावण्यासाठी थांबली होती. सकाळी ती गाडीही गायब झाल्याने त्या गाडीच्या मागावर पोलिस आहेत.

हेही वाचा > धक्कादायक! लहान भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात घातला दगड..जागीच ठार...कारण वाचून व्हाल थक्क..

सकाळी निदर्शनास आला प्रकार

शेमळी (ता. बागलाण) येथील सटाणा-मालेगाव राज्य महामार्गावरील पेट्रोलपंपावर सोमवारी (ता. 22) मध्यरात्री चोरट्यांनी पंपावरील टाकीतून पंपाच्या सहाय्याने सुमारे चार हजार लिटर डिझेलची चोरी करून पोबारा केला. हा प्रकार कर्मचाऱ्यांना सकाळी निदर्शनास आला. 

हेही वाचा > अंत्यविधीची सुरू होती तयारी...अन् 'ती' एक बातमी येताच सगळ्यांनाच फुटला घाम..