धक्कादायक! लहान भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात घातला दगड..जागीच ठार...कारण वाचून व्हाल थक्क..

सकाळ वृत्तसेवा 
Tuesday, 23 June 2020

मोठा भाऊ काहीही कामधंदा करीत नाही. नेहमीच दारू पिऊन घरात वाद घालतो. त्याच्या या वागण्याने काही दिवसांपूर्वी त्याची पत्नी घर सोडून निघून गेेली. तो कुटूंबातील सर्वानां त्रास देत असल्याने संतापलेल्या धाकट्या भावानेच कंटाळून धक्कादायक प्रकार केला.

नाशिक / म्हसरूळ : मोठा भाऊ काहीही कामधंदा करीत नाही. नेहमीच दारू पिऊन घरात वाद घालतो. त्याच्या या वागण्याने काही दिवसांपूर्वी त्याची पत्नी घर सोडून निघून गेेली. तो कुटूंबातील सर्वानां त्रास देत असल्याने संतापलेल्या धाकट्या भावानेच कंटाळून धक्कादायक प्रकार केला.

आठ महिन्यांपूर्वी त्याची पत्नी माहेरी निघून गेली

याबाबत अधिक माहिती अशी की, संतोष आणि सुनील दोघे संख्येभाऊ आपल्या कुटूंबासह मखमालाबाद रोडवरील रो-हाऊसमध्ये राहत आहे. संतोष थोरे याला दारूचे व्यसन असल्याने घरातील सदस्यांना कायमच त्रास देत असे. या त्रासाला कंटाळून आठ महिन्यांपूर्वी त्याची पत्नी माहेरी निघून गेली आहे. सोमवारी संतोष याने सासुरवाडीला जाऊन वाद घातला होता. त्यानंतर आज (ता.२३) सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास तो दारू पिऊन त्याचा भाऊ सुनील हा काम करीत असलेल्या शरदचंद्र पवार मार्केट मध्ये गेला. त्याठिकाणी पुन्हा वाद झाल्याने सुनील याने त्याला गाडीवर बसवून घरी घेऊन जात असताना पेठरोड वरील नामको हॉस्पिटल रस्त्यावर मला दारू पिण्यास जायचे असल्याचे सांगत पुन्हा वाद घातला. यावेळी संतापलेल्या सुनील याने गाडी थांबवून रस्त्यावर असलेला दगड उचलून धाकटा भाऊ संतोष याच्या डोक्यावर मारला. त्यात त्याचा मृत्यू झाला.

पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल झाले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सत्यम पवार, सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय वानखेडे, पोलीस हवालदार सुरेश नरोडे,महेश साळुंखे, प्राज्योक्त जगताप,नितीन जगताप, जितेश जाधव, विष्णु जाधव, संतोष काकड, संदीप शेळके त्यानी तपासाची चक्रे वेगाने फिरवीत यातील मुख्य संशयीत सुनील थोरे याला घरातून ताब्यात घेतले. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा > भरदुपारी सुरु झाल्या प्रसूती कळा...अनुभव नसतांनाही 'तिने' घेतली रिस्क...अन् मग

घटनेने सर्वत्र आश्चर्य

मोठा भाऊ काहीही कामधंदा करीत नाही. नेहमीच दारू पिऊन घरात वाद घालतो. त्याच्या या वागण्याने काही दिवसांपूर्वी त्याची पत्नी घर सोडून निघून गेेली. तो कुटूंबातील सर्वानां त्रास देत असल्याने संतापलेल्या धाकट्या भावानेच त्याच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची घटना घडली. या घटनेत संतोष सखाराम थोरे ( वय. ३९, रा. पूजा विहार रो. हाऊस, मखमलाबाद रोड) याचा जागीच मृत्यू झाला आहे. या खुना प्रकरणी त्याचा भाऊ सुनील सखाराम थोरे (वय ३७) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

हेही वाचा > "पत्नी माझी पळून गेली..जगात तोंड दाखवायला जागा नाही..म्हणून आत्महत्या करतोय" फेसबूकवरील 'त्याची' धक्कादायक पोस्ट 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: younger brother killed the drunken brother nashik marathi news