
अलिकडे खेड्यातही मुलाप्रमाणे मुलगी आपल्या पसंतीच्या मुलाला लग्नापूर्वी भेटून एकमेकांच्या विचारावर चर्चा करून निर्णय घेताना पाहायला मिळत आहे. या उद्देशाने मुलगी अहमदनगरवरून मुलाला नाशिकला भेटायला आली खरी पण यावेळी दोघांना असा मनस्ताप सहन करावा लागला की लग्नाआधीच विघ्न आल्याचा अनुभव या नववधुवरांना मिळाला.
लग्न जमण्याच्या आधीच 'दोघांना' भेटणं पडलं चांगलच महागात...!
नाशिक/ सातपूर : घरच्याना लग्नासाठी होकार देण्यापूर्वीच एकदा तरी मुलाला भेटून चर्चा करावी या उद्देशाने मुलगी अहमदनगरवरून मुलाला नाशिकला भेटायला आली खरी पण यावेळी दोघांना असा मनस्ताप सहन करावा लागला की लग्नाआधीच विघ्न आल्याचा अनुभव या नववधुवरांना मिळाला
अशी घडली हकीकत...
अलिकडे खेड्यातही मुलाप्रमाणे मुलगी आपल्या पसंतीच्या मुलाला लग्नापूर्वी भेटून एकमेकांच्या विचारावर चर्चा करून निर्णय घेताना पाहायला मिळत आहे. त्या अनुषंगाने एक इंजिनिअरींग झालेला मुलगा औद्योगिक क्षेत्रातील एका खाजगी कंपनीत चांगल्या पगारावर जॉब करतो. यावर घरच्यांनी आपल्याच नात्यातील एका मुलीला पसंत करत नवरदेवालाही मुलगी आवडली मुलीलाही नवरदेव पसंत पडला. पण लग्नाला होकार देण्यापूर्वी मित्रमैत्रिणीच्या आग्रहाखातर मुलाला एकदा भेटून त्याच्याशी चर्चा करून निर्णय घ्यावा, या उद्देशाने मुलगी अहमदनगरहून मुलाला भेटण्यासाठी नाशिकला आली. ठरल्याप्रमाणे मुलगा द्वारका सर्कलवर उभा होता. मुलगी गाडीतून उतरून बसस्टॉप शेजारील बंद असलेल्या पोलिस चौकीच्या प्रांगणात गप्पा मारण्यासाठी गेले नाही तोच पोलिस चौकीच्या दादांनी दोघांनाही बोलवून आपल्या खाकीच्या आवाजात विचारपुस करण्यात सुरवात केली. दोघही घाबरलेल्या अवस्थेच आमच लग्न ठरत आहे असं सांगण्याचा प्रयत्नही केला. पण संबंधित पोलिसदादा मात्र भलताच फार्मात आसल्याने त्यांच्या विनंतीला दाद न देता त्या दोघांना चांगलेच फैलावर घेतले.
हेही वाचा > एक स्त्रीलाच दुसरी स्त्री नकोशी!...अज्ञात निष्ठुर मातेने 'नकोशीला' झाडाच्या अडचणीत टाकून केले पलायन
तेवढ्यावरच थांबले नाही तर....
तेवढ्यावरच थांबले नाही तर दोघांच्या आई वडीलाचा नंबर घेवून फोन लावायला सुरवात केली. यामुळे दोघांची चांगलीच पंचाईत झाली. सुरवातीला मुलीच्या वडीलांचा नॉट रिचेबल आल्याने ती वाचली. पण मुलाच्या वडिलांचा मात्र पहिल्या रिंगमध्येच फोन उचलला. पोलिसांनी हकीकत सांगितल्यानंतर मुलाला बोलण्यासाठी फोन दिला. वडिलांना सर्व हकीकत सांगितल्यावर त्यांनीही राग शांत करत पोलिस दादाला सोडण्याची विनंती केली पोलिस दादानी नंतर सोडलेही, पण दोघांनाही लग्नाआधीच विघ्न आल्याचा अनुभव अनुभवायला मिळाला