BREAKING : नाशिक ग्रामीण पोलीस दलातील तिसरा कोरोनाचा बळी..इथेही मालेगाव कनेक्शन

सकाळ वृत्तसेवा 
Tuesday, 26 May 2020

नाशिक ग्रामीण पोलिस स्थानिक गुन्हेशाखेमध्ये कार्यरत पोलिस हवालदार दिलीप घुले तसेच भाऊसाहेब माळी यांना मालेगाव येथे पोलिस बंदोबस्त देण्यात आला होता. नाशिक ग्रामीण पोलिस दलातील माळी हे तिसरे पोलिस कर्मचारी आहेत, जे कोरोनाचे बळी ठरले आहेत. यापूर्वी हिरावाडीतील पोलिस हवालदाराही कोरोनामुळे मयत झाले आहेत. 

नाशिक : मालेगाव पाठोपाठ आता नाशिक शहरात कोरोना विषाणूचा प्रसार वेगाने होतो आहे. कॉलेजरोड परिसरातील रहिवाशी असलेले भाऊसाहेब माळी (वय 51) हे गेल्या आठवड्यात कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यांच्यावर मविप्र रुग्णालयात उपचार सुरू असताना आज (ता.२६) दुपारी त्यांचा मृत्यू झाला. नाशिक ग्रामीण पोलीस दलातील तिसरा कोरोनाचा बळी असून सोमवारीच दिलीप घुले या पोलीसाचाही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पोलीस दलातील पोलीसांच्या कोरोनामुळे मृत्यु होत असल्याने एकच खळबळ उडाली आहे.

चिंताजनक बाब

मालेगाव येथे पोलिस बंदोबस्तातील बाधित पोलिस भाऊसाहेब माळी यांचा मविप्रच्या रुग्णालयात मृत्यु झाला तर सोमवारी (ता.२५) नाशिक ग्रामीण पोलिस स्थानिक गुन्हेशाखेमध्ये कार्यरत पोलिस हवालदार दिलीप घुले यांचा मृत्यू झाला होता. यामुळे जिल्ह्यातील तिसरा पोलिस कोरोनामुळे मृत्युमुखी पडला आहे. जी चिंताजनक बाब ठरत आहे.

हेही वाचा > "रेड झोन' आला आडवा...विवाहितेचा मुलासह आत्महत्येचा निर्णय..त्यावर वडिलांची युक्ती सफल!

मालेगाव पोलिस बंदोबस्तातील बाधित पोलीस कोरोनाचे बळी
नाशिक शहरात सोमवारी (ता. 25) सकाळी कोरोनाबाधित दोघांचा बळी गेला असून यात नाशिक ग्रामीण पोलिस दलातील हवालदाराचा समावेश होता. नाशिक ग्रामीण पोलिस स्थानिक गुन्हेशाखेमध्ये कार्यरत पोलिस हवालदार दिलीप घुले तसेच भाऊसाहेब माळी यांना मालेगाव येथे पोलिस बंदोबस्त देण्यात आला होता.नाशिक ग्रामीण पोलिस दलातील माळी हे तिसरे पोलिस कर्मचारी आहेत, जे कोरोनाचे बळी ठरले आहेत. यापूर्वी हिरावाडीतील पोलिस हवालदाराही कोरोनामुळे मयत झाले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: third death of Corona positive police in Nashik Rural Police Force nashik marathi news