
नाशिक : जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या दररोज वाढताना दिसत आहे, नाशिक शहरात मिशन झीरो नाशिक ही मोहिम सुरु आहे. त्यात घरोघर जाऊन तपासण्या सुरु आहेत. दरम्यान कोरोना रुग्णांची संख्या सध्या तेवीस हजार ३७१ झाली आहे. या पैकी सतरा हजार ५८० रुग्ण हे पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले पाच हजार ११५ रुग्ण आहेत.
नाशिकमधील प्रत्येक प्रभागातील नगरसेवक, स्वयंसेवी संस्था व सामाजिक कार्यकर्ते या सगळ्यांचा तपासण्या करण्यात सहभाग आहे. यामध्ये प्रत्येक प्रभागात सरासरी शंभर रुग्णांची तपासणी केली जाते. त्यात दोन ते तीन टक्के आढळलेल्या रुग्णांंना उपचारासाठी दाखल केले जाते.
कोरोनाचा ससंर्ग नियंत्रणात येईल
शहरात केलेल्या तपासण्यांत पंचावन्न हजार ९७२ नागरिक निगेटिव्ह आढळले. तीन हजार २०३ कंटेनमेंट झोन आहेत. या झोनमध्ये रुग्ण व त्यांच्या संपर्क, कुटुंबातील सदस्य असे शहरातील या तपासण्यांत महापालिकेने छत्तीस हजार ६०६ हाय रिस्क तर बासष्ट हजार १७० लो रिस्क नागरिक आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील सतरा हजार ५८० कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत ६७६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली. जास्तीत जास्ती तपासण्या होत असल्याने लवकरच कोरोनाचा ससंर्ग नियंत्रणात येईल असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
तालुकानिहाय रुग्णांची संख्या
नाशिक ३४८, चांदवड ५५, सिन्नर २०५, दिंडोरी ३२, निफाड २१४, देवळा ६१, नांदगांव १२५, येवला ११, त्र्यंबकेश्वर १८, सुरगाणा ७, कळवण ४, बागलाण ८१, इगतपुरी ३३, मालेगांव तालुका १०७ असे एक हजार ३०१ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नाशिक महानगरपालिका क्षेत्रात तीन हजार ३६६, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ४३८ तर जिल्ह्याबाहेरील १० असे पाच हजार ११५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत जिल्ह्यात २३ हजार ३७१ रुग्ण आढळून आले आहेत.
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी
नाशिकच्या ग्रामीण भागात ७३.४८ टक्के, नाशिक शहरात ७६.२१ टक्के, मालेगावमध्ये ७१.२४ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे हे प्रमाण ७५.२२ इतके आहे. नाशिकच्या ग्रामीण भागातील १७४, नाशिक शहरात ३८६, मालेगांव शहरात ९५ तर जिल्हा बाहेरील २१ अशा ६७६ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
संपादन - रोहित कणसे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.