महालखेड्यात तीन एकर ऊस जळून खाक; शेतकऱ्याचे मोठे नुकसान

प्रमोद पाटील
Thursday, 28 January 2021

महालखेडा येथे अकस्मात लागलेल्या आगीत दीड एकर ऊस भस्मसात झाल्याची घटना मंगळवारी (ता. २६) घडली. या आगीत झालेल्या नुकसानीचा पंचनामा करुन भरपाई देण्याची मागणी संबंधित शेतकऱ्याने केली आहे.

चिचोंडी (नाशिक) : महालखेडा येथे अकस्मात लागलेल्या आगीत दीड एकर ऊस भस्मसात झाल्याची घटना मंगळवारी (ता. २६) घडली. या आगीत झालेल्या नुकसानीचा पंचनामा करुन भरपाई देण्याची मागणी संबंधित शेतकऱ्याने केली आहे.

असा आहे प्रकार

महालखेडा (चां) व महालखेडा (पा) (ता. येवला) या दोन गावांमध्ये  मंगळवारी (ता. २६) व बुधवारी (ता. 27) जानेवारी रोजी झालेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन एकर ऊस जळून खाक झाला आहे. महालखेडा (चां) येथील नामदेव शिवराम कर्हे व रामभाऊ शिवराम कर्हे यांचे दत्तवाडी रोड लगत क्षेत्र आहे. त्यांच्या दोन एकर शेतातील ऊस विजेच्या शॉर्टसर्किटने दुपारच्या वेळी अचानक पेटला. तर महालखेडा पाटोदा येथील भाऊसाहेब मनोहर भगत यांच्याही उसाला शॉर्टसर्किटने आग लागल्यामुळे एक एकर ऊस जळून खाक झाला आहे. या दोन ठिकाणी घडलेल्या घटनांमुळे तीन लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

हेही वाचा > हॉटेल मालकाने बळजबरीने ग्राहकाकडून घेतला ८० हजारांचा ऐवज; मालकावर गुन्हा दाखल

आगीच्या घटनांमुळे ऊस उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. विजेच्या लोंबकळणाऱ्या तारांमुळे नेहमीच शॉर्टसर्किट होण्याचे या भागात प्रकार घडत असतात असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. वीज वितरण कंपनीने याकडे दुर्लक्ष केल्याने अशा घटना नेहमी घडतात. दरम्यान सदर घटनेचा मुखेड येथील तलाठी टिळे यांनी पंचनामा केला असून त्यांच्यासमवेत कृषी सहाय्यक सोमवंशी, वीज वितरण कंपनीचे अरुण गीते हजर होते.

हेही वाचा > सिनेस्टाइल पाठलाग! खंडणीची मागणी करणारा पोलीसांकडून ट्रेस; पोलिसांत गुन्हा दाखल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three acres of sugarcane were burnt at Mahalkheda nashik marathi news