एक वादळी पाऊस अन् नशिबावरच पडली वीज...क्षणात झाले होत्याचे नव्हते!

cloudy.JPG
cloudy.JPG
Updated on

नाशिक : केरसाणे (ता. बागलाण) येथे झालेल्या वादळी पावसात वीज पडून तीन म्हशी ठार झाल्याची घटना शुक्रवारी (ता. 13) रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने त्यामुळे दशरथ आहिरे यांचे दीड लाखांचे नुकसान झाल्याने त्याच्यासह नागरिकांत हळहळ व्यक्त होत आहे.

असा आहे प्रकार

शुक्रवारी (ता. 13) रात्री दहाला झालेल्या पावसात श्री. आहिरे यांच्या मुंगसे रोडलगत असलेल्या गोठ्यावर वीज पडली. या वीज पडल्याने तीन म्हशी जागीच ठार झाल्या. या घटनेचा तलाठी श्री. धोंडगे, कोतवाल कैलास सोनवणे, पशुवैद्यकीय डॉ. सावळे यांनी पंचनामा केला. या वेळी सरपंच फुला माळी, उपसरपंच आशा अहिरे, पोलिसपाटील भाऊसाहेब मोरे, सोसायटी संचालक लक्ष्मण अहिरे, संजय अहिरे, केदा आहिरे, प्रसाद अहिरे आदी उपस्थित होते. 

शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करण्याची आवड होती. त्यासाठी म्हशी घेतल्या. परंतु वीज पडल्याने मोठे नुकसान झाले. - दशरथ आहिरे, शेतकरी, केरसाणे  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com