नाशिक जिल्ह्यात दिवसभरात तिघांचा मृत्‍यू तर १८५ कोरोनामुक्‍त

अरुण मलाणी
Saturday, 28 November 2020

शनिवारी (ता.२८) आढळलेल्‍या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरातील १२३, नाशिक ग्रामीणमधील ११५, मालेगाव येथील ८ तर जिल्‍हाबाहेरील दहा रूग्‍णांचे अहवाल पॉझिटीव्‍ह आले आहेत.

नाशिक : जिल्‍ह्यात उपचार घेत असलेल्‍या कोरोना बाधितांची संख्या पुन्‍हा तीन हजारांच्‍या जवळ पोहोचली आहे. शनिवारी (ता.२८) दिवसभरात २५६ कोरोना बाधित आढळून आले, तर बरे झालेल्‍या रूग्‍णांची संख्या १८५ होती. तीन रूग्‍णांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला. यातून ॲक्‍टिव्‍ह रूग्‍णांच्‍या संख्येत ६८ ने वाढ झाली असून, सद्य स्‍थितीत जिल्‍ह्‍यात २ हजार ८३२ बाधितांवर उपचार सुरू आहेत. 

बाधितांमध्ये नाशिक शहरातील १२३

शनिवारी (ता.२८) आढळलेल्‍या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरातील १२३, नाशिक ग्रामीणमधील ११५, मालेगाव येथील ८ तर जिल्‍हाबाहेरील दहा रूग्‍णांचे अहवाल पॉझिटीव्‍ह आले आहेत. कोरोनामुक्‍त झालेल्‍या रूग्‍णांमध्ये नाशिक शहरातील १११, नाशिक ग्रामीणमधील ५९, मालेगावचे तीन तर जिल्‍हाबाहेरील बारा रूग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरित्‍या मात केली आहे. जिल्‍ह्‍यातील तिन्‍ही मृत रूग्‍ण नाशिक ग्रामीण भागातील आहेत. पिंपळगाव बसवंत (ता.निफाड) येथील ५५ वर्षीय पुरूष, ठाणगाव (ता.सिन्नर) येथील ७२ वर्षीय पुरूष आणि मुंगसरे (ता.सिन्नर) येथील ६५ वर्षीय पुरूष रूग्‍णाचा मृत्‍यू झाल्‍याची नोंद आहे. 

हेही वाचा > आडगावला व्यापाऱ्याला पाच लाखांचा गंडा! ११० क्विंटल लोखंडाच्या मालाचा अपहार

बाधितांची संख्या १ लाख ४२८ वर

यातून जिल्‍ह्‍यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या १ लाख ४२८ वर पोहोचली असून, यापैकी ९५ हजार ८११ रूग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरित्‍या मात केली आहे. १ हजार ७८५ रूग्‍णांचा आतापर्यंत मृत्‍यू झाला असून, सद्य स्‍थितीत २ हजार ८३२ रूग्‍णांवर उपचार सुरू आहेत. शनिवारी दिवसभरात दाखल रूग्‍णांमध्ये नाशिक महापालिका रूग्‍णालये व गृहविलगीकरणात ७३६, नाशिक ग्रामीण रूग्‍णालये व गृहविलगीकरणात ९५, मालेगाव महापालिका रूग्‍णालये व गृहविलगीकरणात ७, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात दोन, जिल्‍हा रूग्‍णालयात चौदा रूग्‍ण दाखल झाले आहेत. सायंकाळी उशीरापर्यंत १ हजार ३२१ रूग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. यापैकी नाशिक महापालिका हद्दीतील ९००, नाशिक ग्रामीणमधील ३६१, तर मालेगाव येथील साठ रूग्‍णांना अहवालाची प्रतिक्षा आहे. 

हेही वाचा > दुर्देवी! वडिलांनाच पाहावा लागला पोटच्या मुलाच्या मृत्यूचा थरार; पायाखालची जमीनच सरकली


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: three corona patients died in a day nashik marathi news