
नाशिक / निफाड : सोशल मीडियाचे जितके जास्त तोटे आहेत, तसेच त्याचे काही फायदे देखील नक्कीच आहेत. असाच सोशल मीडियाचा वापरण्याचा फायदा झाल्याची घटना नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे घडली. नेमके काय घडले?
असा घडला प्रकार
निफाड येथील श्री स्वामी समर्थ मंदिराच्या मागे राहणारा ओम पवार हा तीन वर्षांचा चिमुकला गुरुवारी (ता. 4) साडेपाचच्या सुमारास मार्केट यार्डमध्ये कांद्याच्या खळ्यावर कामाला असणाऱ्या आईकडे मोठ्या बहिणीसोबत निघाला. बहीण आणि भाऊ चालत निफाड बसस्थानका शेजारी असणाऱ्या कमानीतून मार्केटयार्डकडे जात असतांना बहीण आत गेली आणि ओम मात्र वाट चुकला. यातच ओम रस्ता न कळल्याने आणि बहीणही दिसेनासी झाल्यानंतर औरंगाबाद मार्गावरून पायी चालत निघाला. दोन किलोमीटर चालल्यानंतरही आपला ओळखीचा परिसर घर दिसत त्याला न दिसल्याने मात्र ओम घाबरला आणि मोठ्याने रडू लागला.
हताश झालेल्या तरुणांनी पोलिस ठाणे गाठले
यावेळी निफाड येथील काही तरुण मोटारसायकलवरून निफाडकडे जात असताना त्यांना तीन वर्षाचा ओम रस्त्यात रडतांना दिसला. रडणाऱ्या ओमला पाहून त्यांनी त्याचे नाव, गाव विचारत गाडीवर बसवित त्याचे घर शोधण्यास सुरूवात केली. शहरातील विविध परिसरात हे तरूण ओमला फिरवीत त्याचे घर शोधण्याचा प्रयत्न करत होते. मात्र तीन वर्षांच्या ओमला काहीच सांगता येत नसल्याने अखेर हताश झालेल्या तरुणांनी पोलिस ठाणे गाठले. पोलिस ठाण्यात ओमचे छायाचित्र काढून ते शहरातील विविध व्हॉट्सऍप ग्रुपवर शेअर करण्यात आले. आणि अवघ्या काही वेळातच ओमच्या घराजवळ राहणाऱ्या एकाने व्हॉट्सअप वरील ओमचा फोटो पाहून त्यास ओळखले.
आपल्या लेकराला पाहताच आईने घेतले कुशीत
ओम सापडल्याची माहिती त्यांनी तत्काळ ओमच्या आईस देत त्यांना आणि बहिणीला पोलिस ठाण्यात घेवून गेला. यावेळी पोलिस ठाण्याचे नितीन मंडलिक यांनी सर्व ओळख पटवित ओमला त्याच्या आईच्या स्वाधीन केले. तासाभरानंतर आपल्या लेकराला पाहताच आईने कुशीत घेतसुटकेचा नि:श्वास सोडला. प्रशांत खडताळे, हर्षद साळुंके, अमर परदेशी, अतुल परदेशी, रवी भामरे, नागेश जावरे या तरुणांनी केलेले प्रयत्न व सोशल मीडियाचा वापर यामुळे अवघ्या एका तासात चिमुकला आपल्या आईच्या कुशीत विसावला. येथील वाट चुकलेला तीन वर्षांचा चिमुकला अवघ्या तासाभरात सापडत त्याची आणि आईची भेट घडवून आणण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.