धक्कादायक! संकटमोचन हनुमानावरच संकट? चक्क मंदिरावर दगडफेक...काय घडले नेमके?

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 25 June 2020

मुंबई महामार्गावरील अमृतधाम परिसरातील औदुंबरनगर येथे 50 वर्षांपूर्वीचे खोडियार माता मंदिर, दक्षिणमुखी संकटमोचन हनुमान मंदिर आहे. काही कारणास्तव मंदिरावर चक्क दगडफेक करण्यात आली. नेमके काय घडले?

नाशिक / म्हसरूळ : मुंबई महामार्गावरील अमृतधाम परिसरातील औदुंबरनगर येथे 50 वर्षांपूर्वीचे खोडियार माता मंदिर, दक्षिणमुखी संकटमोचन हनुमान मंदिर आहे. काही कारणास्तव मंदिरावर चक्क दगडफेक करण्यात आली. नेमके काय घडले?

चक्क संकटमोचन हनुमान मंदिरावरच केली दगडफेक...

मुंबई महामार्गावरील अमृतधाम परिसरातील औदुंबरनगर येथे 50 वर्षांपूर्वीचे खोडियार माता मंदिर, दक्षिणमुखी संकटमोचन हनुमान मंदिर आहे. या मंदिराचे काही किरकोळ बांधकाम आणि डागडुजी करण्याचे काम मंदिराचे पुजारी बालकदास यांनी बांधकाम कारागीर नरेंद्र निकम यांना दिले होते. जानेवारीत बांधकामला सुरवातही झाली होती. परंतु मार्चमध्ये बांधकाम कारागिराचे निधन झाले. त्यानंतर कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाउन झाल्याने सर्व काम ठप्प झाले. शासनाने आता अनलॉक केल्याने ठप्प झालेल्या कामांना पुन्हा प्रारंभ करण्यात आला. नरेंद्र निकम याने घेतलेले अर्धवट काम मंदिराचे पुजारी बालकदास याने दुसऱ्या कारागिराला दिले. या गोष्टीची कुणकुण मृत कारागिराच्या शुभम व अर्जुन निकम या दोन मुलांना लागली. बुधवारी (ता. 25) मध्यरात्री शुभम व अर्जुन यांनी मित्र रविराज पगार, नितीन पाटील (सर्व रा. गणेशवाडी, पंचवटी) यांच्यासोबत मद्यपान केले. खोडियार माता मंदिर दक्षिणमुखी संकटमोचन हनुमान मंदिराजवळ जाऊन पुजारी बालकदास यांच्याकडे वडिलांनी केलेल्या कामाचे पैसे मागितले. नरेंद्र निकमने सर्व पैसे नेल्याचे मंदिराचे पुजारी बालकदास यांनी सांगितले तरीही चार जण ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. त्यांनी बालकदासला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. चौघांनी मंदिरासमोरच पडलेल्या विटा, दगड उचलून मंदिरावर दगडफेक केली व फरारी झाले. या दगडफेकीत मंदिराचे काही नुकसान झाले. सिंटेक्‍सची पाण्याची मोठी टाकी फुटली आहे. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक! सकाळी हसतमुख दिसलेल्या लेकीची दुपारी डेडबॉडीच...आईने फोडला हंबरडा

चार संशयितांना अटक 

आमदार ऍड. राहुल ढिकले तसेच पंचमुखी हनुमान मंदिराचे महंत भक्तिचरणदास महाराज यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली. पंचवटीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत यांनीही आजूबाजूला चौकशी करून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. त्यावरून चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्यांनीच हा प्रकार केल्याचे कबूल केले. या प्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.  वडिलांनी केलेल्या बांधकामाचा मोबदला न दिल्याच्या कारणावरून अमृतधाम परिसरातील औदुंबरनगर येथील एका मंदिरावर दगडफेक केल्याची घटना घडली. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी चार संशयितांना अटक केली आहे. 

हेही वाचा > सावध व्हा...'हा' आजार पडेल महागात...कोरोनाचे व्हाल बळी!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Throwing stones at the temple at Audumbarnagar nashik marathi news