'या' क्षेत्राव्यतिरिक्त अत्यावश्‍यक सेवांवरील वेळेचे बंधन मागे; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

0suraj_mandhre_0.jpeg
0suraj_mandhre_0.jpeg

नाशिक : राज्य शासनाने जारी केलेल्या नियमावलीमध्ये अत्यावश्‍यक सेवांसाठी वेळेचे कुठल्याही स्वरूपातील बंधन नसल्याचे नमुद केले आहे. या पार्श्‍वभुमीवर नाशिक शहर व जिल्ह्यात अत्यावश्‍यक सेवांसाठी यापूर्वी सकाळी दहा ते दुपारी चार अशा वेळेचे बंधन मागे घेत असल्याचे जिल्हा प्रशासनातर्फे स्पष्ट केले आहे. त्यामूळे यापूर्वीच्या वेळांप्रमाणे या सेवा उपलब्ध असतील. 

वेळेचे बंधन मागे घेण्याचा निर्णय

शहरी भागासह ग्रामीण भागातही कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता, अत्यावश्‍यक सेवांकरीता वेळेचे बंधन घालण्यात आले होते. त्यानुसार सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत या सेवा सुरू राहतील, असे आदेश जिल्हा प्रशासनातर्फे काढण्यात आले होते. जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त व महापालिका आयुक्त यांनी संयुक्‍त बैठक घेतांना हा निर्णय जाहीर केला होता. परीणामी गेल्या काही दिवसांपासून किराणा दुकान, दूध, भाजीपाला यांसह अन्य अत्यावश्‍यक सेवेतील दुकाने सकाळी दहा ते दुपारी चार असे सहा तास खुले असायचे. वैद्यकीय सेवांना मात्र या निर्णयातून वगळलेले होते. गर्दी टाळण्यासाठी ही उपाययोजना केली असली तरी, काही ठिकाणी वेळेच्या बंधनामुळे गर्दीचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनात आले होते.

मात्र हे क्षेत्र वगळले

तर राज्य शासनातर्फे लॉकडाऊनदरम्यान काही बाबींकरीता सुट दिली आहे. यात अत्यावश्‍यक सेवेंना वेळेचे बंधन नसावे, अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हा प्रशासनानेही सकाळी दहा ते दुपारी चार असे वेळेचे बंधन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि ही सूट ज्या भागात कन्टेनमेन्ट झोन जाहीर झालेले आहेत त्या भागात लागू असणार नाही . तसेच ज्या परिसरात नव्याने कोविड-19 चे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येतील त्या भागात सदर सूट तात्काळ बंद करण्यात येईल, असे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आज जारी केले आहेत.

शासनाच्या निर्देशांत अत्यावश्‍यक सेवेसाठी वेळेचे बंधन सांगितलेले नाही. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने यापूर्वी जाहिर केलेली सकाळी दहा ते दुपारी चार अशी वेळ मर्यादा मागे घेतली जाते आहे. - सूरज मांढरे, जिल्हाधिकारी


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com