सिनेस्टाईल थरार! पोलिसांची चाहूल लागताच रिक्षाचालकाने ठोकली धूम; अखेर संशय खरा ठरला

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 29 October 2020

भरदुपारचा सिनेस्टाईल प्रकार...पोलिस पेट्रोलिंग करत असतांना संशयास्पद उभी असलेली अ‍ॅटो रिक्षा दिसली. चौकशी केली असता पोलिसही चक्रावले. पोलिसांची चाहूल लागताच रिक्षाचालकाने ठोकली धूम. अन् सुरु झाला सिनेस्टाईल पाठलागचा थरार...अन् नंतर घडले असे

नाशिक : भरदुपारचा सिनेस्टाईल प्रकार...पोलिस पेट्रोलिंग करत असतांना संशयास्पद उभी असलेली अ‍ॅटो रिक्षा दिसली. चौकशी केली असता पोलिसही चक्रावले. पोलिसांची चाहूल लागताच रिक्षाचालकाने ठोकली धूम. अन् सुरु झाला सिनेस्टाईल पाठलागचा थरार...अन् नंतर घडले असे

अशी आहे घटना

बुधवारी (ता. २८) दुपारची वेळ... नाशिक ते वाडीवर्‍हे रोडवर रायगडनगर जवळ नाशिक जिल्हा वाहतूक शाखेचे कर्मचारी पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी त्यांना रस्त्याजवळ संशयास्पद अ‍ॅटो रिक्षा दिसली. पोलिसांनी चौकशी केली असता रिक्षातील ४ ते ५ जणांनी कोयत्याचा धाक दाखवून मारहाण करत दोन हजार रूपये हिसकावल्याचे आयशर वाहनाच्या चालकाने सांगितले. पोलिसांची चाहूल लागताच त्या चोरट्यांनी मात्र धूम ठोकली. अन् सुरु झाला सिनेस्टाईल पाठलाग. मात्र त्यातील दोघांना डोंगराकडील परिसरातून पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडले. ग्रामस्थांनीही खारीचा वाटा देत तिघांना पकडण्यात सहकार्य केले. 

हेही वाचा >  दुर्दैवी! शेतातील ती भातकापणी ठरली शेवटची; तरुण शेतकरीच्या बातमीने गाव हळहळले

पोलीस अधीक्षकांनीही केले कौतुक

याप्रकरणी वाडीवर्‍हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार सुनील शिंदे, गिरीष निकुंभ व पोलीस नाईक बापूराव पारखे यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक सचिन यांनी त्यांचा सत्कार केला. विशेष म्हणजे, अटक करण्यात आलेले पाच सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर नाशिक शहरात खून, दरोडा, जबरी चोरी, घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचा > दुर्दैवी! शेतातील ती भातकापणी ठरली शेवटची; तरुण शेतकरीच्या बातमीने गाव हळहळले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The traffic police caught the criminals in the inn nashik marathi news