esakal | दुर्दैवी! शेतातील ती भातकापणी ठरली शेवटची; तरुण शेतकरीच्या बातमीने गाव हळहळले
sakal

बोलून बातमी शोधा

somnath chaudhri farmer.jpg

सोमनाथ चौधरी हा तरुण शेतकरी शेतात  भातकापणी करायला गेला. पण त्याला देखील ठाऊक नव्हते कि क्षणार्धात सर्वकाही संपणार आहे. अचानक आलेल्या त्या बातमीने मात्र गावात शोककळा पसरली आहे. 

दुर्दैवी! शेतातील ती भातकापणी ठरली शेवटची; तरुण शेतकरीच्या बातमीने गाव हळहळले

sakal_logo
By
रखमाजी सुपारे

पेठ (नाशिक) : सोमनाथ चौधरी हा तरुण शेतकरी शेतात  भातकापणी करायला गेला. पण त्याला देखील ठाऊक नव्हते कि क्षणार्धात सर्वकाही संपणार आहे. अचानक आलेल्या त्या बातमीने मात्र गावात शोककळा पसरली आहे. 

शेतातील ती भातकापणी ठरली शेवटची

नाचलोंढीपैकी होमपाडा (ता. पेठ) येथे बुधवारी (ता. २८) शेतकरी सोमनाथ याची त्या दिवशीची भातकापणी शेवटचीच ठरली. कारण त्याला देखील ठाऊक नव्हते कि क्षणार्धात सर्वकाही संपणार आहे. अचानक आलेल्या त्या बातमीने मात्र गावात शोककळा पसरली आहे. सोमनाथ अशोक चौधरी (वय २८) शेतात भातकापणी करत असताना कडपीखाली असलेल्या सर्पाने पायाला दंश केला. तरुणाचा सर्पदंशाने मृत्यू झाला.

हेही वाचा > ह्रदयद्रावक; आजोबांना दोन घास दिल्याचे समाधान घेऊनच नात झाली देवाला प्रिय, दसऱ्याच्या दिवशीच हळहळ

अचानक मृत्यूने गावावर शोककळा

नातेवाइकांनी त्यास तत्काळ हरसूलच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, अंगात विष भिनल्याने उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यास मृत घोषित केले. याबाबत विष्णू चौधरी यांनी दिलेल्या माहितीवरून हरसूल पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद झाली. हवालदार के. के. भोये तपास करीत आहेत. सोमनाथच्या अचानक मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे.  

हेही वाचा >  पिंपळगावच्या टोमॅटोचा देशभरात डंका! सव्वाचारशे कोटी शेतकऱ्यांच्या पदरात 

go to top