esakal | आदिवासी पैठणी कारागिरांच्या घरट्याचे स्वप्न होणार साकार! बैठकीत हिरवा कंदील 
sakal

बोलून बातमी शोधा

paithni workers.jpg

पैठणीचे माहेरघरी पारंपरिक हातमाग विणकर कारागिरांबरोबर विणकाम काम करून व प्रशिक्षण घेऊन आदिवासी बांधवांनी देखील पैठणी कला आत्मसात केली आहे. याच आदिवासी पैठणी कारागिरांना आता हक्काचे घर मिळणार आहे.

आदिवासी पैठणी कारागिरांच्या घरट्याचे स्वप्न होणार साकार! बैठकीत हिरवा कंदील 

sakal_logo
By
संतोष विंचू

येवला (जि. नाशिक)  : पैठणीचे माहेरघरी पारंपरिक हातमाग विणकर कारागिरांबरोबर विणकाम काम करून व प्रशिक्षण घेऊन आदिवासी बांधवांनी देखील पैठणी कला आत्मसात केली आहे. याच आदिवासी पैठणी कारागिरांना आता हक्काचे घर मिळणार आहे.

आदिवासी पैठणी कारागिरांच्या घरट्याचे स्वप्न होणार साकार 
आदिवासी बांधवानी मोठया संख्येने पैठणी विणकामामध्ये तालुक्यात मजल मारली आहे. चांगल्या पद्धतीने पैठणीचे नक्षीकाम, सर्व पैठणीच्या सर्व हस्तकला आदिवासी तरुणांनी आत्मसात केल्या आहेत. आदिवासी मुलांनी पैठणी विणकामामध्ये आपलं कुटुंब गुंतवले आहे. परंतु आपली परिस्थिती नाजूक असल्यामुळे ही कला शिकून तालुक्याच्या ठिकाणी काम करण्यासाठी यावे लागते. या सर्व गोष्टींचा अभ्यास करून सभापती प्रवीण गायकवाड यांनी या आदिवासी तरुणांना शबरी घरकुल योजनेमधून घरकुल मिळाले पाहिजे, यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्याकडे मागणी केली होती. 

हेही वाचा > आता नाशिक-मुंबई प्रवास केवळ अडीच तासांवर! उद्योग व्यवसायाला मिळणार मोठी चालना 

देवळाणे येथे आदिवासी पैठणी कारागिरांची बैठकीत हिरवा कंदील 
या मागणीला प्रतिसाद देत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आदिवासी तरुणांना शबरी घरकुल योजनेतून घरकुल मंजूर करून दिले आहे. या आदिवासी तरुणांना हक्काचे घर मिळणार आहे.  यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी पुढाकार घेतल्याने पंचायत समिती सभापती प्रवीण गायकवाड यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. देवळाणे (ता.येवला) गावात आदिवासी पैठणी कारागिरांची बैठक पार पडली असून यावेळी बनसोड, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झणकर, प्रतिभा भदाणे, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले, सभापती प्रवीण गायकवाड आदी उपस्थित होते. 

हेही वाचा > आठशे सीसीटीव्हीतून शहर नजरेच्या एकाच टप्प्यात! कमांड कंट्रोल सेंटर सज्ज

संपादन - ज्योती देवरे