त्र्यंबकेश्‍वर रथोत्सवाची याचिका न्यायालयाने फेटाळली; भाविकांचा भ्रमनिरास 

कमलाकर अकोलकर
Saturday, 28 November 2020

आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्‍वराच्या रथोत्सवाचा विषय चांगलाच पेटला आहे. याबाबत नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. शुक्रवारी दिवसभर प्रशासकीय निर्णयाविरोधात लोकभावना व्यक्त होत होत्या. इतरत्र रथोत्सवांना परवानग्या मिळतात; पण त्र्यंबकेश्‍वरला दुजाभाव अशाच सामान्यांच्या प्रतिक्रिया होत्या. 

त्र्यंबकेश्‍वर ( नाशिक) :  आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्‍वराच्या रथोत्सवाचा विषय चांगलाच पेटला आहे. याबाबत नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. शुक्रवारी दिवसभर प्रशासकीय निर्णयाविरोधात लोकभावना व्यक्त होत होत्या. इतरत्र रथोत्सवांना परवानग्या मिळतात; पण त्र्यंबकेश्‍वरला दुजाभाव अशाच सामान्यांच्या प्रतिक्रिया होत्या. 

दरम्यान, हा विषय घेऊन येथील तरुण भाविक न्यायालयात गेले आहेत. मात्र त्यांना न्यायालयात दिलासा मिळू शकला नाही. दोन आठवड्यांपासून गल्लोगल्ली तयारी सुरू असलेल्या त्र्यंबकराजाचा रथोत्सव होणार नसल्याचे रात्री साडेआठनंतर स्पष्ट झाल्यानंतर गावात त्याबाबत तीव्र नाराजी उमटली.

हेही वाचा > दुर्देवी! वडिलांनाच पाहावा लागला पोटच्या मुलाच्या मृत्यूचा थरार; पायाखालची जमीनच सरकली

ऐनवेळी परवानगी नाकारली

येथील पारंपरिक रथोत्सवाची तयारी पूर्ण झाली असताना ऐनवेळी परवानगी नाकारल्याने येथील ॲड. रुद्र लोहगावकर, ॲड. धनंजय देशमुख, निखिल महाजन, धनंजय मुंदडा यांनी रात्रीतून मुंबई गाठून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. रथोत्सवाला परवानगी मिळविण्याचा प्रयत्न केला. उच्च न्यायालयात रिटपिटीशन दाखल केले. त्यांच्यातर्फे ॲड. निखिल पुजारी व किशोर पाटील यांनी न्यायधीश धनको यांच्या खंडपीठापुढे युक्तिवाद केला. परंतु सरकारी वकिलांनी काही ठिकाणी अशा कार्यक्रमात लोकांनी नियम तोडले व त्यामुळे मूळ कारणाला फाटे फुटतात, असा युक्तिवाद करीत कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी गर्दी आणि गर्दी टाळण्यासाठी परवानगी नाकारल्याचे लक्षात आणून दिल्याने ही याचिका फेटाळण्यात आली. 

हेही वाचा > आडगावला व्यापाऱ्याला पाच लाखांचा गंडा! ११० क्विंटल लोखंडाच्या मालाचा अपहार

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Trimbakeshwar Rathotsava petition rejected by the court nashik marathi news