बुधवारी आकाशात दिसणारे ते दृष्य म्हणजे "धूमकेतू"की आणखी काही?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 फेब्रुवारी 2020

बुधवारी पहाटे आकाशात एक चमत्कारिक दृष्य दिसले. जणू काही ते धुमकेतू असल्याचे वाटत होते. पण तो धुमकेतू असेल तर त्याच्या मार्गात येणाऱ्या ताऱ्यांचा स्फोट होताना दिसला असता..मात्र तसे काही झालेच नाही. त्यामुळे नेमका हा धुमकेतू आहे किंवा आणखी काही? अशी उत्सुकता निर्माण झाली.

नाशिक :  बुधवारी पहाटे आकाशात एक चमत्कारिक दृष्य दिसले. जणू काही ते धुमकेतू असल्याचे वाटत होते. पण तो धुमकेतू असेल तर त्याच्या मार्गात येणाऱ्या ताऱ्यांचा स्फोट होताना दिसला असता..मात्र तसे काही झालेच नाही. त्यामुळे नेमका हा धुमकेतू आहे किंवा आणखी काही? अशी उत्सुकता निर्माण झाली. धुमकेतू प्रमाणे वाटणारे ते दृष्य वृश्चिक राशीकडून गुरुग्रहाकडे जात होते. या दरम्यान काही वेळेनंतर पहाट होऊ लागल्याने प्रकाशात हा अद्भुत नजारा दिसेनासा झाला. या अनपेक्षित दृष्यामुळे सर्वांच्या मनात या बद्दल उत्सुकता निर्माण झाली होती..पण..

हे आहे सत्य..चीनची गुप्तता

बुधवारी पहाटे ४.४५ वाजता पूर्व क्षितीजावर एक चमत्कारिक दृष्य दिसले. अतिशय अनपेक्षित असलेल्या या दृष्यात धुमकेतू जात असल्याचे दिसत होते. मात्र हे सारे होत असताना स्फोट होणारे तारे मात्र दिसत नव्हते. त्यामुळे नेमका धुमकेतू आहे किंवा अन्य काय? अशी उत्सुकता निर्माण झाली. मात्र धुमकेतू जात असल्याचे दृष्य आकाशात दिसत असताना प्रत्यक्ष ते चीनने पाठविलेले २ डी लाँग मार्च नावाचे रॉकेट असल्याचे खगोल अभ्यासकांनी सांगितले. धुमकेतू सदृष्य असणारे दृष्य वृश्चिक राशीकडून गुरुग्रहाकडे जात होते. या दरम्यान काही वेळेनंतर पहाट होऊ लागल्याने चंद्र कोरीच्या प्रकाशात ते अद्भुत दृष्य दिसेनासे झाले.

हेही वाचा > ज्या आईच्या उदरातून जन्म घेतला, त्यावरच 'त्याने' घाव घातला...

वायूमंडळाशी झालेल्या संपर्कामुळे यानाने पृथ्वीची गुरुत्वाकर्षण सिमा ओलांडल्यानंतर त्या यानाला जोडलेले बुस्टर रॉकेट मुख्य रॉकेटपासून अलग झाल्यानंतर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाने वायूमंडळाशी त्याचे घर्षण झाले. त्यामुळे त्याने पेट घेतल्याने असे दृष्य तयार झाले. २ डी रॉकेट बाबत गुप्तता चीनने हे रॉकेट झिचॅग उपग्रह प्रक्षेपण केंद्रावरून सोडले आहे. या लाँग मार्च २ डी रॉकेटमध्ये काय सोडण्यात आले आहे याबाबत मात्र चीनने गुप्तता पाळली आहे.

हेही वाचा > सुनेला वाचविण्यासाठी 'ते' पुढे सरसावले!...तर मुलाने त्यांनाच

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: truth about surprising astronomical incident Nashik Marathi News