पाणीपुरी विक्रेत्यावरील भाईगिरी 'त्यांना' चांगलीच पडली महागात..!

panipuri seller.jpg
panipuri seller.jpg

नाशिक : गेल्या महिन्यात अंबड-लिंक रोडवर पाणीपुरी विक्रेत्यासह एकावर भाईगिरी करीत चॉपरने हल्ला करणाऱ्या दोघांच्या नागपूरमध्ये मुसक्‍या आवळल्या. गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे. घटनेनंतर गेल्या तीन आठवड्यांपासून पसार झालेल्या संशयितांच्या मागावर गुन्हे शाखेचे पोलिस होते. 

असा घडला प्रकार...
करण अण्णा कडुस्कर, मनोज भोजने (दोघे रा. अंबड) असे भाईगिरी करणाऱ्या दोघा संशयितांची नावे आहेत. गेल्या 26 जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास संशयित कडुस्कर व भोजने यांनी अंबड लिंक रोडवरील कृष्णानगरमधील बालाजी मोबाईल शॉपीसमोर असलेल्या पाणीपुरी विक्रेत्यावर भाईगिरी करीत त्यांच्या गाड्याची व सामानाची नासधुस केली. त्यानंतर त्यांनी चॉपरने हल्ला करीत जखमी केले होते. याप्रकरणी अंबड पोलिसात ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. तसेच, संशयितांच्या भाईगिरीमुळे त्रस्त झालेल्या अंबडवासियांनी अंबड-लिंक रोडवर रास्तारोको आंदोलन केले होते. पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांची घटनास्थळी दाखल होत नागरिकांशी संवाद साधत संशयितांच्या मुसक्‍या आवळण्याचे व कठोर कारवाईचे आश्‍वासन दिले होते. 

पोलिस संशयितांच्या मागावर होते

परंतु गेल्या तीन आठवड्यापासून संशतिय कडुस्कर व भोजने हे दोघे पसार होते. पोलिस संशयितांच्या मागावर होते. दरम्यान, गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलिस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांना संशयित हे नागपूर येथे दडून बसल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार, त्यांचे पथक नागपूरकडे रवाना झाले आणि संशयित दोघांच्या मुसक्‍या आवळून, नाशिकमध्ये आणले आहे. सदरची कामगिरी गुन्हेशाखेचे उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट दोनचे पोलिस निरीक्षक दिनेश बर्डेकर व त्यांच्या पथकाने केली. 
हेही वाचा > ज्या आईच्या उदरातून जन्म घेतला, त्यावरच 'त्याने' घाव घातला...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com