esakal | वाद सोडवणे बेतले दोघा भावांंच्या जीवावर! पोलीस कॉन्स्टेबल ठरणार घटनेचे महत्वपूर्ण साक्षीदार; काय घडले नेमके?
sakal

बोलून बातमी शोधा

sampat pagere dead.jpg

ही घटना कोकणे कुटुंबियांनी आपल्या नातलगांना फोनवर कळविली. या घटनेची माहिती मिळताच सूर्यभान पागेरे, संपत पागेरे,व अरविंद यादव हे भांडण सोडवण्यासाठी हजर झाले असता त्यांच्यावरही अचानक धारदार शस्राने वार केले. डोक्याला गंभीर जखम झाल्यानंतर संपत पागेरे जमिनीवर कोसळले. 

वाद सोडवणे बेतले दोघा भावांंच्या जीवावर! पोलीस कॉन्स्टेबल ठरणार घटनेचे महत्वपूर्ण साक्षीदार; काय घडले नेमके?

sakal_logo
By
ज्ञानेश्वर गुळवे

नाशिक / अस्वली स्टेशन : इगतपुरी तालुक्यातील नांदगाव बु येथे जमिनीच्या वादातून दोन गटात भीषण हाणामारी झाली. वाद सोडवण्यासाठी गेलेल्या दोन भावांना धारदार शस्राने मारहाण करण्यात आली. या धक्कादायक प्रकाराने अवघे गाव हादरले आहे. काय घडले नेमके?

काय घडले नेमके?

रविवार सकाळी दहा वाजेच्या दरम्यान गणपत कोकणे (रा.कोरपगाव) यांची नांदगाव बु शिवारात ब्रिटीशकालीन पुलाजवळ शेती आहे. रस्त्याच्या कडेला एका ठिकाणी मशीनच्या साहाय्याने खोदकाम चालू होते. त्याच वेळी अंकुश नामदेव पागेरे, सतिश किसन पागेरे, नामदेव किसन पागेरे, माधव किसन पागेरे, स्वराज सतीश पागेरे, सुमनबाई नामदेव पागेरे, रुपाली अंकुश पागेरे रा.सर्व नांदगाव बु यांनी गणपत कोकणे व त्यांच्या कुटुंबातील पत्नी मुलगा साहेबराव, संदीप, दिलीप या सर्वांना आमच्या जागेत खोदकाम का केले?ही जागा आमची आहे अशी विचारणा करीत शिवीगाळ केली आणि लाकडी दंडुक्यांच्या लोखंडी गजाच्या साहाय्याने अचानक मारहाण करायला सुरुवात केली. यात संदीप कोकणे, साहेबराव कोकणे व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर हल्ला केला. यात साहेबराव,बेशुद्ध झाला तर संदीप गंभीर जखमी झाला. आरडाओरडा ऐकून मजूर विठ्ठल पळत आला असता त्याचेवरही हल्ला चढवला.

एकाचा उपचारादरम्यान मृत्यू
 याबाबतची सर्व घटना कोकणे कुटुंबियांनी आपल्या नातलगांना फोनवर कळवले या घटनेची माहिती मिळताच सूर्यभान पागेरे, संपत पागेरे,व अरविंद यादव हे भांडण सोडवण्यासाठी हजर झाले असता त्यांच्यावरही अचानक धारदार शस्राने वार केले डोक्याला गंभीर जखम झाल्यानंतर संपत पागेरे जमिनीवर कोसळले. रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेत दोघांनाही नाशिकला हलविण्यात आले.  या झटापटीत सूर्यभान, संपत या दोन्ही भावांसह संदीप आणि साहेबराव त्याचप्रमाणे आरोपी असलेले एकूण नऊ जण जखमी झाले होते यात संपत पागेरेचा काळ सायंकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला तर इतरांवर उपचार सुरू आहे.संपत पागेरेचे (ता.२६) सकाळी नऊ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

हेही वाचा > ''पोलिस आयुक्त साहेब..पीएफच्या फाईलवर सही करा नाहीतर आत्महत्या'' पोलिस कर्मचाऱ्याने थेट कंट्रोललाच सांगितली आपबिती

पोलीस कॉन्स्टेबलही ठरणार महत्वपूर्ण सरकारी साक्षीदार 

वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत भा.द.वि. ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली असून जखमी असलेले तीन आरोपी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल असून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनाही अटक करण्यात येणार असल्याची माहिती वाडीवऱ्हेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत जाधव यांनी दिली आहे.  या धुमचक्रीत परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत  विशेष म्हणजे यादरम्यान वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कॉन्स्टेबलही उपस्थित असल्याने घटनेचे महत्वपूर्ण सरकारी साक्षीदार ठरणार आहे. 

हेही वाचा > संजीवनीदायक मालेगावच्या काढ्यामुळे 'अवघड जागेचं दुखणं' वाढतंय? वाचा डॉक्टरांचे मत​

जिल्हा रुग्णालयाबाहेर संतप्त नातेवाईकांची गर्दी
दरम्यान हाणामारीत मेंदूला जबर मार लागल्याने संपत पागेरे या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान काल संध्याकाळी पाच वाजता त्यांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूची माहिती कळताच जिल्हा रुग्णालयाबाहेर संतप्त नातेवाईकांनी गर्दी केली जोपर्यंत आरोपींना कडक शासन होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा निर्णय घेतल्यानंतर काही काळ तणाव निर्माण झाला होता.

रिपोर्ट - ज्ञानेश्वर गुळवे

संपादन -  ज्योती देवरे