सुर्यास्त पाहण्यास गेलेल्या 6 मित्रांच्या ग्रुपमधील २ मित्रांच्या जीवनाचा अस्त; ती पिकनिक ठरली अखेरची! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

eSakal (30).jpg

सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास सहा मित्रांचा ग्रुप दुचाकींवरून फिरण्यासाठी गंगापूर धरण परिसरात गेले. ते सर्व जण सायंकाळी सूर्यास्त बघून घरी परतणार होते. पण तिथेच दोघांच्या जीवनाचा अस्त झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

सुर्यास्त पाहण्यास गेलेल्या 6 मित्रांच्या ग्रुपमधील २ मित्रांच्या जीवनाचा अस्त; ती पिकनिक ठरली अखेरची!

जुने नाशिक / गिरणारे : सोमवारी (ता.५) दुपारी दोनच्या सुमारास सहा मित्रांचा ग्रुप दुचाकींवरून फिरण्यासाठी गंगापूर धरण परिसरात गेले. ते सर्व जण सायंकाळी सूर्यास्त बघून घरी परतणार होते. पण तिथेच दोघांच्या जीवनाचा अस्त झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

सुर्यास्त पाहण्यास गेलेल्या २ मित्रांच्या जीवनाचा अस्त

सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास सहा मित्रांचा ग्रुप दुचाकींवरून फिरण्यासाठी गंगापूर धरण परिसरात गेले. ते सर्व जण सायंकाळी सूर्यास्त बघून घरी परतणार होते. फोटो काढण्याच्या नादात कैफ उमर शेख, साबीर सलीम बेग अचानक पाण्यात कोसळले. एकमेकांना वाचविण्यासाठी दोघांनी प्रयत्न केला. मात्र, पोहता येत नसल्याने व पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघेही गटांगळ्या खाऊ लागले. या वेळी त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून त्यांच्यासोबत आलेले अन्य मित्रही त्यांच्या मदतीसाठी धावले. मात्र, तोपर्यंत दोघेही पाण्यात बुडाले होते.

दोघे धरणातील पाइपमध्ये अडकले

मित्रांनी आजूबाजूला धाव घेत स्थानिक युवक व नागरिकांना सांगून मदतीला बोलावले. काही स्थानिक जलतरणपटूंनी पाण्यात सूर लगावत दोघांचा शोध सुरू केला. सुमारे तासाभरानंतर कैफ आणि साबीर यांचे मृतदेह हाती आले. दोघे धरणातील पाइपमध्ये अडकले होते. उर्वरित चौघांनी परिसरात येऊन माहिती दिली. त्या दोघांच्या मृत्यूने जुने नाशिक परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रात्री उशिरा रसूलबाग कब्रस्तानात दफनविधी करण्यात आला.  

दोन अल्पवयीन मुलांचा धरणात बुडून मृत्यू

गंगापूर धरण  परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या सहा मित्रांपैकी दोन अल्पवयीन मुलांचा धरणात बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (ता. ५) सायंकाळी घडली. कैफ उमर शेख (वय १५), साबीर सलीम बेग (१६, दोघे रा. खडकाळी, त्र्यंबक पोलिस चौकीमागे) अशी मृतांची नावे आहेत. शेख फरान सत्तर (१७), सुफियान हसन चांद (१५), सुफियान जमीर शेख (१७), कैफ नसीर खान (१७) हे चौघे वाचले.

Web Title: Two Minors Old Nashik Gangapur Dam Drowning Death Nashik Marathi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NashikGangapur
go to top