COVID-19 : दुबईहून आलेल्या 'त्या' दोन क्वारंटाइन यांना इगतपुरी रेल्वे स्टेशनवर उतरवले!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 मार्च 2020

दुबई येथून भारतात परतलेले दोन परप्रांतीय प्रवाशी मुंबई येथे विमानतळावर उतरले असता त्यांची तपासणी करून त्यांच्या हातावर शिक्के मारण्यात आले असुन ते दोघेही आपल्या राज्यात गावी जाण्यासाठी ते रेल्वेने प्रवास करीत असल्याचे लक्षात आल्याने प्रवाशांनी त्यांच्या हातावरील शिक्के बघून एकच कल्लोळ माजवला. 

नाशिक : (इगतपुरी) दुबई येथून भारतात परतलेले दोन परप्रांतीय प्रवाशी मुंबई येथे विमानतळावर उतरले असता त्यांची तपासणी करून त्यांच्या हातावर शिक्के मारण्यात आले असुन ते दोघेही आपल्या राज्यात गावी जाण्यासाठी ते रेल्वेने प्रवास करीत असल्याचे लक्षात आल्याने प्रवाशांनी त्यांच्या हातावरील शिक्के बघून एकच कल्लोळ माजवला. 

रेल्वेच्या मुंबई - गोहाटी एक्स्प्रेसने प्रवास करीत होते

दुबई येथून भारतात परतलेले दोन परप्रांतीय प्रवाशी मुंबई येथे विमानतळावर उतरले असता त्यांची तपासणी करून त्यांच्या हातावर शिक्के मारण्यात आले असुन ते दोघेही आपल्या राज्यात गावी जाण्यासाठी शनिवारी ( ता.21) रेल्वेच्या मुंबई - गोहाटी एक्स्प्रेसने प्रवास करीत असता इतर जागृत प्रवाशांनी त्यांच्या हातावरील शिक्के बघून एकच कल्लोळ माजवला. यामुळे इगतपुरी रेल्वे स्टेशनवर रेल्वे सुरक्षा दलाचे पोलीस निरीक्षक एस. एस. बर्वे यांनी व त्यांच्या जवानांनी त्या दोघांना गाडीतून उतरवून घेतले. येथे डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून केली त्यांना विलगीकरणाची आवश्यकता असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात पाठवण्यात आल्याची माहीती तहसीलदार अर्चना पागीरे यांनी दिली. संपूर्ण जगाला कोरोना व्हायरस या जिवघेण्या रोगाने ग्रासले आहे त्याचा शिरकाव आपल्या भारतात केला असुन महाराष्ट्र राज्यात कोरोना ग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. या रोगाला पायबंद घालण्यासाठी देशाचे पंतप्रधान व राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अत्यावश्यक सेवा वगळता सर्वांवर बंदी घातली आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वत्र बंद पाळण्यात आला आहे. 

त्या दोन परप्रांतीय प्रवाशांना ताब्यात घेण्यात आले

31 मार्च पर्यंत सर्वत्र बंद असल्या कारणाने बाहेरील राज्यातून यु.पी/ बिहार या ठिकाणानवरुन महाराष्ट्र राज्यात कामधंद्याच्या शोधात आलेल्या परप्रांतीयांचे लोंढे परत आपआपल्या राज्यात जातांना दिसत आहेत. बाहेर राज्यातील मेल / एक्स्प्रेस गाड्या मुंबईहुन भरभरून जातांना दिसत आहेत. दरम्यान या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासना मार्फत योग्यती दक्षता घेतली जात आहे. भारतातले नागरिक परदेशात गेलेल्या नागरिकांना त्यांच्या परतीच्या वेळी प्रत्येक प्रवाशांची तपासणी केली जाते. 

हेही वाचा > चक्क 'या' कंपन्यांकडून तब्बल तीनशे कोटींचा घोटाळा...!

लागण झालेल्या रुग्णांना योग्य त्या ठिकाणी डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवले जात आहे. व ज्यांना सोडून देण्यात येते त्यांच्या हातावर स्टॅम ( शिक्का ) मारला जातो. त्याच पार्श्वभूमीवर शनिवारी दुबई येथून भारतात परतलेले दोन परप्रांतीय प्रवाशांना ताब्यात घेण्यात आले.  

हेही वाचा > नळजोडणी नसतांनाही 'पाणीपट्टी'?...'इथं' चाललाय भोंगळ कारभार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two suspected coroners from Dubai leave for detention at District Hospital nashik marathi news