धक्कादायक! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 'इथे' होतोय जीवाशी खेळ..अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 मे 2020

कोरोना संसर्गाच्या साथीवर आळा घालण्यासाठी सॅनिटायझरचा वापर अनिवार्य ठरतो आहे. गेल्या काही महिन्यांपासून सॅनिटायझरची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्याच बरोबर सरकारने अनुदान देत आणि त्याच्या किंमतीही कमी केल्या आहेत. मात्र वाढलेल्या मागणीमुळे काही लोकांनी याचा गैरफायदा घ्यायला सुरुवात केली आहे.

नाशिक / डीजीपी नगर : कोरोना संसर्गाच्या साथीवर आळा घालण्यासाठी सॅनिटायझरचा वापर अनिवार्य ठरतो आहे. गेल्या काही महिन्यांपासून सॅनिटायझरची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्याच बरोबर सरकारने अनुदान देत आणि त्याच्या किंमतीही कमी केल्या आहेत. मात्र वाढलेल्या मागणीमुळे काही लोकांनी याचा गैरफायदा घ्यायला सुरुवात केली आहे.

इथे होतोय जीवाशी खेळ

किराणा दुकान, जनरल स्टोअर्स तसेच रस्त्यावर ठिकठिकाणी स्टॉल लावून अनधिकृतपणे विनापरवाना सॅनिटायझरची विक्री होत असून अनधिकृत विक्री करणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी केमिस्ट संघटनेने केली आहे. कोरोना संसर्गाच्या काळात सॅनिटायझरचे महत्व वाढले आहे. मात्र अनेक किरकोळ व ठोक किराणा दुकानदार तसेच रस्त्यावर ठिकठिकाणी स्टॉल लावून सॅनिटायझरची विक्री करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. 

केवळ औषधी दुकानावरून याच्या विक्रीला परवानगी

कोरोना संसर्गाच्या साथीवर आळा घालण्यासाठी सॅनिटायझरचा वापर अनिवार्य ठरतो आहे. गेल्या काही महिन्यांपासून सॅनिटायझरची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्याच बरोबर सरकारने अनुदान देत आणि त्याच्या किमतीही कमी केल्या आहेत. मात्र वाढलेल्या मागणीचा फायदा घेत अनेकांनी जादा दराने विक्री सुरू केली आहे. त्याचबरोबर अनेक किराणा दुकांदारांनीही सॅनिटायझरची विक्री सुरू केली आहे .अन्न व औषध प्रशासनाकडून सॅनिटायझर चा साठा अथवा जादा दराने विक्री करणाऱ्यांवर  सातत्याने कारवाई केली जात आहे. अन्न व औषध कायदा १९४० नुसार सॅनिटायझर हे औषध संधीत संज्ञेत मोडते . त्यामुळे केवळ औषधी दुकानावरून विक्रीला परवानगी आहे . मात्र गेल्या काही दिवसात सॅनिटायझरची वाढलेली मागणी पाहता ठोक व किरकोळ किराणा माल तसेच ठिकठिकाणी स्टॉल लावून रस्त्यावर त्याची विक्री करू लागले आहेत .

हेही वाचा > सप्तपदीही झाली...अन् नवरीला सोडून नवरदेवाचे वर्‍हाडी फिरले माघारी...बातमी समजल्यावर मंडळींना मोठा धक्का

आढळून आल्यास होणार तातडीने कारवाई  

अन्न व औषध कायदा १९४० नुसार सॅनिटायझर हे औषध  संज्ञेत मोडते . त्यामुळे केवळ औषधी दुकानावरून विक्रीला परवानगी आहे   बेकायदेशीर सॅनिटायझरची विक्री होत असल्याचे आढळून आल्यास तातडीने कारवाई केली जाईल तसेच अनधिकृत सॅनीटायझर साठा करणारे किंवा जादा दराने विक्री करणाऱ्यांवर देखील आम्ही कारवाई करत आहोत - दुष्यंत भामरे. सहआयुक्त ,अन्न व औषध प्रशासन 

बेकायदेशीररित्या विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई

सॅनिटायझर्समध्ये एथिल अल्कोहोल, ईसोप्रोपिल अल्कोहोल  हे घटक असतात सदर सॅनिटायसेर्स हे  ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट १९४० अंतर्गत याचे उत्पादन, विक्री होणे गरजेचे आहे.नाशिक शहरात व परिसरात किराणा दुकानदार तसेच रस्त्यावर ठिकाणी अनधिकृतपणे बेकायदेशीररीत्या सँनिटाईझरची विक्री होत असून बेकायदेशीररित्या विक्री करणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासनाने कठोर कार्यवाही करावी. - अतुल अहिरे, अध्यक्ष नाशिक जिल्हा केमिस्ट असोसिएशन

हेही वाचा > ''तिच्या आईवडिलांनी आमच्या लग्नाला परवानगी नाकरली.. म्हणूनच मी तिच्यासोबत.. ''..माथेफिरू युवकाची धक्कादायक जबानी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unauthorized sale of unlicensed sanitizer by installing toll stalls nashik marathi news