चुलत काकूवर जडले प्रेम..पुतण्याने काढला काकाचा काटा!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 मार्च 2020

न्यायालयाने त्यास येत्या २४ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. कोपरगाव येथील संजीवनी साखर कारखान्यात नोकरीस असलेला अशोक उर्फ किरण कोंडीराम शेळके हा येवला तालुक्यातील खामगाव शिवारातील शेळके वस्तीवर राहत होता. त्याच्या वस्तीशेजारी त्याच्याच नात्यातील चुलत पुतण्या मुकेश साहेबराव शेळके राहत होता. मुकेशचे अशोकच्या पत्नीवर म्हणजे काकीवर एकतर्फी प्रेम जडले. यानंतर...

नाशिक :  तालुक्यातील खामगाव शिवारातील शेळके वस्तीत चुलत काकूवर असलेल्या एकतर्फी प्रेमातून पुतण्याने काकाचा खून केल्याची घटना खुनाची घटना घडली. येवला पोलिसांनी याप्रकरणी पुतण्यास जेरबंद केले.

असा घडला प्रकार...

न्यायालयाने त्यास येत्या २४ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. कोपरगाव येथील संजीवनी साखर कारखान्यात नोकरीस असलेला अशोक उर्फ किरण कोंडीराम शेळके हा येवला तालुक्यातील खामगाव शिवारातील शेळके वस्तीवर राहत होता. त्याच्या वस्तीशेजारी त्याच्याच नात्यातील चुलत पुतण्या मुकेश साहेबराव शेळके राहत होता. मुकेशचे अशोकच्या पत्नीवर एकतर्फी प्रेम जडले. प्रेमातील अडसर असलेल्या अशोकचा कायमचा काटा काढण्याचे मुकेशने ठरविले. मंगळवारी (दि.१७) रात्री नऊ वाजेच्या सुमारास मुकेश शेळके संवत्सर येथून शेळके वस्तीवर आला आणि अशोकच्या घरातील वीजपुरवठा बंद केला. अशोक विजेच्या पोलजवळ पोहोचताच अंधारात दबा धरून बसलेल्या मुकेशने त्याच्या डोक्यावर व हातावर कुऱ्हाडीने वार केले. जखमी झालेल्या अशोकने आरडाओरड करताच त्याची पत्नी धावत आली. तोपर्यंत मुकेशने तेथून पोबारा केला होता. जवळपासच्या नागरिकांनी अशोकला आधी वैजापूर आणि नंतर औरंगाबाद येथील घाटी हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र त्यादरम्यान अशोकचा मृत्यू झाला.

हेही वाचा > धक्कादायक! आंघोळीसाठी 'तीघी' तलावात उतरल्या...अन् थोड्या वेळाने मृतदेहच पडले बाहेर..

आरोपीस सुनावली पोलिस कोठडी

घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिस स्टेशनचे निरीक्षक अनिल भवारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक उदयसिंग राजपुत यांच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवली. घटनेनंतर दोन तासांतच संशयित आरोपी मुकेशला त्यांनी ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून गुरुवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्याला येत्या २४ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

हेही वाचा > दहावीतला मुलगा पेपरच्या आदल्या दिवशीच मित्रासह पळाला....रेल्वे स्टेशनहून दोघांची खबर आली की..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uncle Murder by one sided love Nashik Crime News