अचानक मातीचा थर निखळून कोसळला..अन् काही क्षणांतच..

Under a Heap of Soil Three youths die in Rokdapada.jpg
Under a Heap of Soil Three youths die in Rokdapada.jpg
Updated on

नाशिक : रोकडपाडा (ता. सुरगाणा) येथील घरगुती वापरासाठी मुरूम खणत असताना मातीचा ढिगारा अंगावर पडून तीन तरुणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. मंगळवारी (ता. 28) दुपारी साडेबाराच्या सुमारास ही दुर्घटना घडली. 

अशी घडली घटना...

रोकडपाडा शिवारात सहा तरुण घरगुती वापरासाठी मुरूम आणायला गेले होते. खड्ड्यातून मुरूम खोदून ते ट्रॅक्‍टरच्या ट्रॉलीमध्ये टाकत होते. वरवर मातीचा थर असल्याने त्यांनी गुहेसारखे खोदकाम केले व आतून निव्वळ मुरूम काढत असतानाच अचानक मातीचा थर निखळून कोसळला. या ढिगाऱ्याखाली दिनेश फुलाजी खांडवी (वय 22), मनोहर फुलाजी खांडवी (19) हे दोघे सख्खे भाऊ व गोविंद गुलाब खांडवी (23) असे तिघे दबले गेले. अन्य तिघे माती टाकण्यासाठी ट्रॉलीकडे गेल्यामुळे बचावले. आरडाओरड होताच जवळपासचे 25 ते 30 ग्रामस्थ मदतीला धावून आले. त्यांनी दबलेल्या तिघांनाही बाहेर काढून सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे दोघा भावांचा मृत्यू झाल्याचे डॉ. पांडोले यांनी तपासणी करून घोषित केले. तर, गंभीर जखमी गोविंद यास ऍम्ब्युलन्समधून उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेत असताना वाटेत दिंडोरीजवळ त्याचा मृत्यू झाला.

रोकडपाडा व परिसरावर शोककळा पसरली...

गावातील तीन तरुणांचा अकस्मात मृत्यू झाल्याने रोकडपाडा व परिसरावर शोककळा पसरली असून, तालुक्‍यात हळहळ व्यक्त केली जात आहे. तहसीलदार विजय सूर्यवंशी यांना या दुर्घटनेची माहिती देण्यात आली. पोलिस निरीक्षक दिवाणसिंग वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार गांगुर्डे तपास करीत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com