ओढणीचा झोका बेतला चिमुरड्याच्या जीवावर...मुलाची अवस्था पाहून आईने फोडला हंबरडा

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 3 May 2020

लहान मुलांना खेळण्यासाठी अनेकांच्या घरीच ओढणीचे झोके बांधलेले असतात. मस्ती करत लहान मुलं त्याच्यावर वेडेवाकडे खेळतात. पण अशात पालकांनी त्यांच्यावर लक्ष देणं महत्त्वाचं आहे. कारण त्यांचा दुर्लक्षितपणा मुलांच्या जीवावर बेतू शकतो..अशीच एक घटना नाशिकच्या बिडी कामगार नगरमध्ये घडली आहे. ज्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

नाशिक : लहान मुलांना खेळण्यासाठी अनेकांच्या घरीच ओढणीचे झोके बांधलेले असतात. मस्ती करत लहान मुलं त्याच्यावर वेडेवाकडे खेळतात. पण अशात पालकांनी त्यांच्यावर लक्ष देणं महत्त्वाचं आहे. कारण त्यांचा दुर्लक्षितपणा मुलांच्या जीवावर बेतू शकतो..अशीच एक घटना नाशिकच्या बिडी कामगार नगरमध्ये घडली आहे.  या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होतेय.

अशी घडली घटना

बिडी कामगार नगरमध्ये किरण काशिनाथ शर्मा (8, रा. शनि मंदिरामागे, बिडी कामगारनगर, पंचवटी) आठ वर्षीय चिमुकला गेल्या शनिवारी (ता. 2) सकाळी तो घरातच खेळत होता. गंंमत म्हणून तिने घरातील ओढणीचा झोका बांधला त्यावर तो झोके घेऊ लागला. परंतु काही कळायच्या आत या ओढणीचा फास त्याच्या गळ्याभोवती आवळला गेला.ओढणीच्या पाळण्यात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आलेल्या मुलाला पाहताच आई-वडिलांनी एकच हंबरडा फोडला. ही बाब लक्षात येताच त्यास तातडीने आडगाव वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. परंतु तत्पुर्वीच त्याचा मृत्यू झाल्याने डॉक्‍टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी आडगाव पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. 

हेही वाचा > कोरोनाची धडक थेट शेतकऱ्याच्या बांधावरच!...चांदवडला पुन्हा एक पॉझिटिव्ह

हेही वाचा > लॉकडाउनमध्ये हरविले सासरे...जावयाला बघून आनंदाश्रू अन् हुंदके ही...मन हेलावून टाकणारी घटना

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: unfortunate death of a child due to a snare nashik crime marathi news

Tags
टॉपिकस
Topic Tags: