घनकचरा व्यवस्थापन विभागाची एक 'अनोखी' कारवाई; अन् परिरस झाला चकाचक

योगेश मोरे
Saturday, 16 January 2021

नाशिक महापालिकेची पहिल्या दहा शहरांमध्ये येण्यासाठी धडपड सुरू आहे. ऑगस्ट २०२० मध्ये जाहीर केलेल्या क्रमवारीत देशात ११, तर राज्यात नाशिक दुसऱ्या क्रमांकावर राहिले. त्या अनुषंगाने नाशिक शहरात ‘स्वच्छ शहर सर्वेक्षण’ अंतर्गत जोरदार कामकाज सुरू आहे. 

म्हसरूळ (नाशिक) : येथील भाजी बाजारात अस्वच्छता करणाऱ्या विक्रेत्यांकडूनच स्वच्छता करून घेत घनकचरा व्यवस्थापन विभागाने अनोखी कारवाई केली. विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई न करता, एक अनोखी कारवाई केल्याने त्याची दिवसभर चांगलीच चर्चा रंगली होती. वाचा नेमके काय घडले?

घनकचरा व्यवस्थापन विभागाची अनोखी कारवाई 

घराप्रमाणेच शहर स्वच्छ ठेवण्याच्या संकल्पनेला चालना मिळावी, म्हणून केंद्र सरकारतर्फे पाच वर्षांपासून ‘स्वच्छ शहर सर्वेक्षण’ सुरू आहे. यासाठी शहरांमध्ये स्पर्धा निर्माण करून केंद्राच्या नागरी विकास मंत्रालयाकडून दर वर्षी क्रमांक जाहीर केले जातात. नाशिक महापालिकेची पहिल्या दहा शहरांमध्ये येण्यासाठी धडपड सुरू आहे. ऑगस्ट २०२० मध्ये जाहीर केलेल्या क्रमवारीत देशात ११, तर राज्यात नाशिक दुसऱ्या क्रमांकावर राहिले. त्या अनुषंगाने नाशिक शहरात ‘स्वच्छ शहर सर्वेक्षण’ अंतर्गत जोरदार कामकाज सुरू आहे. 

हेही वाचा >  देवी भक्ताच्या बँक खात्यावरही पडली वाईट नजर; महाराष्ट्रात परतताच प्रकार उघडकीस

असा आहे प्रकार

शुक्रवारी (ता.१५) प्रभाग एकमध्ये म्हसरूळ येथील भाजी बाजारात घनकचरा व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी साफसफाई करत असताना फूटपाथलगत साचलेला कचरा आढळून आला. त्यासंबंधी चौकशी केली असता भाजीपाला विक्रेत्याने हा कचरा केला असल्याचे निष्पन्न झाले. त्यावर दंडात्मक कारवाई करावयास गेले असता त्यांनी दंड देण्यास असमर्थता दर्शवली. परंतू, त्या विक्रेत्यास स्वच्छतेचे महत्त्व पटावे, यासाठी दंडात्मक कारवाई म्हणून एक दिवस सार्वजनिक सेवा देऊन त्याच्याकडून फूटपाथलगत असलेला कचरा गोळा करण्याचे काम करून घेण्यात आले. रोख दंड भरण्यास नकार देणाऱ्या भाजी विक्रेत्याने मोठ्या उत्साहाने परिसर स्वच्छ केल्याचे दिसून आले. 

हेही वाचा > लॉजमध्ये सापडला प्रेयसीचा मृतदेह अन् घाबरलेला प्रियकर; काय घडले चार भिंतीत?

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unique action of Nashik Solid Waste Management Department nashik marathi news