आरोग्य विद्यापीठाच्या पदवी अन्‌ पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा होणार 'या' तारखेपासून

सकाळ वृत्तसेवा 
Saturday, 4 July 2020

परीक्षेचे वेळापत्रक 45 दिवस अगोदर जाहीर करण्याबाबतचा आदेश प्रति-कुलपती तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिला होता. त्या अनुषंगाने विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र 2020 मधील परीक्षा टप्प्याटप्प्याने घेण्यात येणार आहेत. याबाबतचे सविस्तर वेळापत्रक विद्यापीठाचे संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले.

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षा कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर सरकारच्या निर्देशानुसार पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता उन्हाळी सत्रातील आरोग्य विद्या शाखा अभ्यासक्रमाच्या परीक्षेस 4 ऑगस्ट 2020 पासून सुरवात होईल. 

विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर 
परीक्षेचे वेळापत्रक 45 दिवस अगोदर जाहीर करण्याबाबतचा आदेश प्रति-कुलपती तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिला होता. त्या अनुषंगाने विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र 2020 मधील परीक्षा टप्प्याटप्प्याने घेण्यात येणार आहेत. याबाबतचे सविस्तर वेळापत्रक विद्यापीठाचे संकेतस्थळ www.muhs.ac.in वर जाहीर करण्यात आले आहे. 

लेखी परीक्षेनंतर लगेच होणार प्रात्यक्षिक परीक्षा ​
विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक म्हणाले, की उन्हाळी सत्रातील पदवीपूर्व अंतिम वर्ष अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे वेळापत्रक 5 जूनला जाहीर केले होते. पण, वेळापत्रकात एक दिवसाचा खंड देण्यात आलेला नव्हता. मग पदवीपूर्व अंतिम वर्षाच्या वेळापत्रकामध्ये एक दिवसाचा खंड देऊन 16 जुलैऐवजी 3 ऑगस्टपासून नियोजित करण्यात आले आहे. तसेच बी. एस्सी. इन पॅरामेडिकल टेक्‍नोलॉजी, डिप्लोमा इन पॅरामेडिकल टेक्‍नोलॉजी, मास्टर इन पब्लिक हेल्थ न्यूट्रिशन, एम. बी. ए. (हेल्थ केअर ऍडमिनिस्ट्रेशन), एम. एस्सी. (फार्मा. मेडिसिन), पी. जी. डीएमएलटी, बॅचलर इन ऑप्टोमेट्री, डिप्लोमा इन ऑप्टोमेट्री, डिप्लोमा इन ऑप्थालमिक, सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकोलॉजी या अभ्यासक्रमांच्या लेखी परीक्षा 18 ऑगस्टपासून घेण्यात येतील. 

हेही वाचा > भयंकर..आमरस खाण्यासाठी नाशिकच्या पाहुण्यांना खास निमंत्रण..अन् तिथेच झाला घात..! गावात दहशत..

अन्य सर्व अभ्यासक्रमांचा समावेश
दरम्यान, विद्यापीठाचे पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. त्यामध्ये ऍलोपॅथी अभ्यासक्रमाच्या परीक्षेचे वेळापत्रक वगळता अन्य सर्व अभ्यासक्रमांचा समावेश आहे. दंत, होमिओपॅथी, आयुर्वेद, युनानी, फिजिओथेरपी, ऑक्‍युपेशनल थेरपी, नर्सिंग, स्पीच लॅंग्वेज पॅथोलॉजी अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षा 18 ऑगस्टपासून सुरू होणार आहेत. विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा झाल्यानंतर तातडीने त्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा होतील, असे डॉ. पाठक यांनी म्हटले आहे. विद्यापीठाचे संकेतस्थळ www.muhs.ac.in यावरील माहिती अधिकृत असेल.  

हेही वाचा >  सोसायटीचे कर्ज..लहान बहिणीचे लग्न..लहान वयातच जबाबदारीचं ओझं..एका भावाची नशिबाशी झुंज अपयशी..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: University of Health Degree and Post Graduate Examination news nashik marathi news