युपीएससी परीक्षेसाठी उमेदवारांनी गाठले मुंबई, पुणे; एसटी बससेवेला मात्र अल्प प्रतिसाद

अरुण मलाणी
Sunday, 4 October 2020

युपीएससीतर्फे मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर अशा सहा शहरांमध्ये परीक्षा केंद्र उपलब्‍ध करून दिले होते. यापैकी नाशिकच्‍या उमेदवारांचे परीक्षा केंद्र मुंबई आणि पुणे परीसरात होते.

नाशिक : केंद्रिय लोकसेवा आयोग (युपीएससी) यांच्‍यातर्फे नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२० चे रविवारी (ता.४) आयोजन केले होते. मुंबई, पुण्यासह राज्‍यातील सहा शहरांमध्ये ही परीक्षा पार पडली. कोरोनाच्‍या पार्श्वभुमिवर दळणवळण व्‍यवस्‍था विस्‍खळीत झालेली असल्‍याने नाशिकच्‍या उमेदवारांना परीक्षा केंद्र असलेल्‍या शहरात पोहोचण्यासाठी महाराष्ट्र राज्‍य मार्ग परीवहन महामंडळाने बसगाड्या उपलब्‍ध केल्‍या होत्‍या. मात्र या बससेवेला अल्‍प प्रतिसाद मिळाला आहे. अनेक उमेदवारांनी स्‍वतःच्‍या वाहनाने प्रवास केल्‍याचे यातून समोर आले. 

युपीएससीतर्फे मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर अशा सहा शहरांमध्ये परीक्षा केंद्र उपलब्‍ध करून दिले होते. यापैकी नाशिकच्‍या उमेदवारांचे परीक्षा केंद्र मुंबई आणि पुणे परीसरात होते. त्‍यामुळे एसटी महामंडळाने उमेदवारांच्‍या सुविधेसाठी बसगाड्या उपलब्‍ध करून दिल्‍या होत्या. पुण्यासाठी नवीन सीबीएस बसस्‍थानकातून तर मुंबईकरीता महामार्ग बसस्‍थानकाहून बस सोडली होती. मात्र, या गाड्यांना उमेदवारांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्‍यामुळे पुणेसाठी सोडलेल्‍या बसगाड्या माघारी बोलविल्या. काही उमेदवार काल (ता.३) परीक्षेसाठी रवाना झालेले होते. मुंबईकरीता सोडलेल्‍या बसला मात्र चांगला प्रतिसाद मिळाला. 
 

हेही वाचा > संतापजनक! सोळा वर्षाच्या युवतीसोबत चाळीस वर्षीय नवरदेवाचे लग्न; बालविवाह कायद्यातंर्गत गुन्हा दाखल

पाच ते सहा हजार परीक्षार्थी 

युपीएससीतर्फे घेतल्‍या जाणा परीक्षांना जिल्‍ह्‍यातून दहा हजारांहून अधिक उमेदवार सामोरे जात असतात. परंतु यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता अन्‍य शहरात जाऊन परीक्षा देणे अनेक परीक्षार्थ्यांनी टाळल्‍याचे जाणवले. यातून सुमारे सहा हजार उमेदवारांनी ही परीक्षा दिली असल्‍याचे जाणकारांचे म्‍हणणे आहे.  

 

हेही वाचा >  ब्रेकिंग : पाकिस्तानसाठी तोफखान्याची हेरगिरी करणारा नाशिकमधून ताब्यात; सीमेवर तणावपूर्ण वातावरण असताना प्रकरण उजेडात


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: UPSC candidates reach Mumbai, Pune from nashik marathi news