लॉकडाऊनमुळे 'त्याने' व्यवसाय बदलला पण संघर्ष करणे सोडले नाही

माणिक देसाई : सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जून 2020

लॉकडाउनमुळे तीन महिन्यापासून अनेकांचे रोजगार गेले, तर कुणाचा व्यवसाय बंद पडला. लॉकडाउनमुळे काळी-पिवळीच्या माध्यामातून प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकांचाही रोजगार हिरावला. त्यामुळे त्यांना घर चालविणे अवघड झाले आहे.

नाशिक : (निफाड) लॉकडाउनमुळे तीन महिन्यापासून अनेकांचे रोजगार गेले, तर कुणाचा व्यवसाय बंद पडला. वाहनांची चाक फिरली नाही म्हणून यातील अनेक काळी-पिवळी चालक रडत न बसता कुटुंबकबिला चालवण्यासाठी सरकारच्या मदतीची वाट न पाहता कुणी भाजी विक्रेता, कुणी फळविक्रेता, तर कुणी द्राक्षबाग कामगारांची टोळी बनवून आपला उदरनिर्वाह करत आहे. 

तर कुणी बनले द्राक्षबाग कामगार 

निफाड परिसरातील दोनशेहून अधिक प्रवासी वाहतूक करणारे चालक आहेत. निफाड-नाशिक-येवला-पिंपळगाव-उगाव-लासलगाव पट्ट्यात प्रवासी वाहतूक करायची अन्‌ त्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा, असा शिरस्ता ठरलेला आहे. मार्चमध्ये लॉकडाउनमुळे त्यांच्या वाहनांची चाके थांबली आणि आर्थिक उत्पन्नही. यात अनेकांनी कर्ज काढून वाहन घेतले होते. आता वाहनांचे कर्ज फेडण्याबरोबरच अशा परिस्थितीत घराचा गाडा चालविण्या करिता या चालकांनी हातावर हात ठेवून न बसता नवीन व्यवसाय सुरू करत आपला उदरनिर्वाह सुरू केला. यात विशेष म्हणजे ज्या महामार्गवर वाहन चालवून ते आपला आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते, त्याच महामार्गावर अनेकांनी पालेभाज्या आणि फळविक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. यात उगाव आणि नैताळे परिसरातील काळी- पिवळी चालकांनी एकत्र येत द्राक्ष कामगारांची टोळी बनवत द्राक्षबागांची कामे सुरू केली आहेत. 

हेही वाचा > धक्कादायक! विवाहित महिलेची माहेरी गळफास घेऊन आत्महत्या...परिसरात खळबळ

लॉकडाउन झाला आणि आमच्यापुढे समस्यांचे डोंगर उभे राहिले. एप्रिलमध्ये वातावरण निवळण्याची वाट बघितली. पण चाके काही फिरली नाही म्हणून संसाराचा गाडा चालविण्यासाठी केळी अन्‌ शेगा घेऊन रस्त्यावर बसलो. - शकील शेख (काळी पिवळी, चालक, निफाड) 

हेही वाचा > धक्कादायक! हॉटेलमध्ये पोलिसांची एंट्री होताच सुरु झाली पळापळ...नेमकं काय घडले?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The van driver is doing another business by changing business in the lockdown nashik marathi news