लॉकडाउनमध्ये तुमचेही वाहन जप्त केलंय का?...मग ही बातमी तुमच्यासाठी

lockdown.jpg
lockdown.jpg

नाशिक : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आला असतानाही, विनाकारण वाहने घेऊन फिरणाऱ्यांची वाहने पोलिसांनी जप्त केली. मात्र वाहनमालकांना ही वाहने परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, लॉकडाऊन काळात पुन्हा सदरचे वाहन विनाकारण रस्त्यावर फिरताना आढळून आल्यास गुन्हा दाखल केला जाणार आहे. यामुळे गेल्या दीड महिन्यांपासून पोलिस ठाण्यांच्या आवारात धुळखात पडून असलेली वाहने त्यांच्या मालकांना परत मिळत असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. 

सुमारे 2 हजार 146 दुचाक्‍या, चारचाकी, रिक्षा ​

शहर पोलिस आयुक्तालय हद्दीमध्ये गेल्या 23 मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी व जमावबंदी जारी करण्यात आलेली होती. दीड महिन्याच्या या काळात अत्यावश्‍यक सेवा वगळता विनाकारण घराबाहेर पडून वाहनांवर फिरणाऱ्यांविरोधात कलम 188 अन्वये कारवाई करीत, वाहन जमा करण्याची कारवाई करण्यात आली होती. त्यानुसार पोलिस आयुक्तालय हद्दीमध्ये पोलिसांनी कारवाई करीत सुमारे 2 हजार 146 दुचाक्‍या, चारचाकी, रिक्षा अशी वाहने जप्त केली होती. यामध्ये 1 हजार 853 दुचाक्‍या होत्या. तर, पंचवटी पोलिस ठाण्यात सुमारे 200 चारचाकी व दुचाकी वाहने, भद्रकाली पोलिस ठाण्यात 500, आडगाव पोलिस ठाण्यात 150, तर सरकारवाडा पोलिस ठाण्यात 110 वाहने जप्त करण्यात आलेली आहेत. 
मात्र, या वाहनांमुळे पोलिस ठाण्यातील जागा तर अडकलीच शिवाय, ही वाहने सांभाळणेही जिकिरीचे झालेले आहे.

वाहनमालकांना त्यांचे वाहन परत

दुसरीकडे काही वाहनचालकांनी न्यायालयात धाव घेत, त्यानुसार आदेशानुसार त्यांची वाहने पोलिस ठाण्यातून सोडण्यात आली. मात्र तरीही बरीच वाहने अजूनही पोलिस ठाण्यांमध्ये आहेत. यावर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकाऱ्यांकडे वाहनमालकाने बॉण्डसह वाहनाची मूळ कागदपत्रांसह संपर्क साधावयाचा आहे. प्रतिज्ञापत्र दिल्यानंतर त्या वाहनमालकांना त्यांचे वाहन पोलिस ठाण्याकडून दिले जात आहे. परंतु परत लॉकडाऊनच्या काळात वाहन विनाकारण रस्त्यावर फिरताना आढळून आल्यास गुन्हा दाखल केला जाणार असल्याचीही ताकीद पोलिसांकडून देण्यात आलेली आहे. 

वाहनमालकाने बॉण्ड आणि वाहनाची कागदपत्रांची पूर्तता केली. तर अशी वाहने त्यांच्या मालकांकडे सुपूर्द केली जात आहेत. मात्र पुन्हा लॉकडाऊन काळात वाहन आढळून आले तर कठोर कारवाई केली जाणार आहे. - साजन सोनवणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, भद्रकाली पोलीस ठाणे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com