पंचवटीत मंगळवारी पाणीबाणी

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 2 May 2020

पंचवटी विभागातील पंचवटी जलशुध्दीकरण केंद्राच्या आवारात असलेल्या नवीन 17.50 लक्ष लिटर क्षमतेच्या जलकुंभाच्या मुख्य जल वितरण वाहीनीच्या क्रॉस कनेक्‍शनचे काम मंगळवारी (ता. 5) हाती घेतले जाणार आहे.

 
नाशिक -  पंचवटी विभागातील पंचवटी जलशुध्दीकरण केंद्राच्या आवारात असलेल्या नवीन 17.50 लक्ष लिटर क्षमतेच्या जलकुंभाच्या मुख्य जल वितरण वाहीनीच्या क्रॉस कनेक्‍शनचे काम मंगळवारी (ता. 5) हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे जलकुंभावरुन पाणी वितरण होणारा प्रभाग क्रमांक 4 मधील आर.टी.ओ. मेरी परिसर, तारवाला नगर, स्वस्तीक नगर, लामखेडे मळा ते हिरावाडी दिंडोरी रोडवरील अवधुतवाडी, फुले नगर, पंचवटी पोलिस स्टेशन, श्रीरामनगर, लोकसहकार नगर, निमाणी परीसर त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक पाच मधील मधील निमाणी ते पंचवटी कारंजा परिसर, पंचवटी भाजी मार्केट, दिंडोरी नाका, पेठ नाका, इंदकुंड, एरंडवाडी, मेघराज बेकरी ते पंचवटी कारंजा मालेगांव स्टॅंन्ड पासुन रामकुंडा पर्यंत पंचवटी गावठाण मधील मालविय चौक शनिचौक व रामकुंड परीसर आदी परिसरात मंगळवारचा दिवसभराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे तर बुधवारी (ता.6) सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water Shortage in Panchavati