esakal | खोदकाम करतांना सापडली सोन्याची घागर? बघायला गाव झाले गोळा; प्रत्यक्षात मात्र वेगळाच प्रकार
sakal

बोलून बातमी शोधा

coin2.jpg

गावात जुन्या घराचे खोदकाम सुरु होते. कुठून कळले ठाऊक नाही. पण गावभर झाली चर्चा की सापडली घरात सोन्याची घागर. ज्याची त्याची एकच धावपळ घागर बघण्यासाठी गाव झाले गोळा. कोणी दारातून तर कोणी खिडकीतून डोकावू लागले. अन् नंतर मग झाले असे...

खोदकाम करतांना सापडली सोन्याची घागर? बघायला गाव झाले गोळा; प्रत्यक्षात मात्र वेगळाच प्रकार

sakal_logo
By
चेतन चौधरी

नाशिक : गोजोरे (ता. भुसावळ) गावात जुन्या घराचे खोदकाम सुरु होते. कुठून कळले ठाऊक नाही. पण गावभर झाली चर्चा की सापडली घरात सोन्याची घागर. ज्याची त्याची एकच धावपळ घागर बघण्यासाठी गाव झाले गोळा. कोणी दारातून तर कोणी खिडकीतून डोकावू लागले. अन् नंतर मग झाले असे...

अशी आहे घटना

परशुराम ज्ञानदेव राणे (रा. गोजोरे) यांच्या जुन्या घराच्या भिंती पाडण्याचे काम बुधवारी (ता. १९) सुरू होते. या वेळी राणे यांच्या घरातील देवघराजवळ (देव्हारा) सोन्याची घागर सापडल्याची अफवा गावात पसरली. गावातील पोलिसपाटलांनी याबाबत भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात माहिती दिली. पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी ही माहिती भुसावळच्या तहसीलदारांना कळविली आणि श्री. कुंभार व सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल पवार कर्मचाऱ्यांसह गोजोरे गावात पोचले. घटनास्थळी पाहणी केली असता, जुन्या काळातील १८६२, १८७२, १८८६ व १९०१ मधील एकूण १९ नाणी सापडल्याचे सांगण्यात आले. सहाय्यक निरीक्षक पवार व भुसावळचे नायब तहसीलदार शशिकांत इंगळे यांनी पंचनामा करून रात्री उशिरापर्यंत सर्व नाणी सील करण्याचे काम सुरू होते. 

हेही वाचा > लिफ्ट देण्याच्या बहाण्याने करायचे लूटमार; मुंबईतील संशयिताच्या नाशिक पोलिसांनी आवळल्या मुसक्या

कुटुंबीयांना चांगलाच मनस्ताप

दरम्यान, गावात सोन्याची घागर सापडल्याची अफवा पसरल्याने राणे कुटुंबीयांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागल्याचे समजते. पोलिस व महसूलचे अधिकारी, कर्मचारी वेळीच पोचल्याने नाण्यांची सत्यता बाहेर आल्याचे जाणकारांनी सांगितले. परिसराचे मंडळ अधिकारी सतीश इंगळे यांनी याबाबत माहिती दिली. भुसावळ तालुका पोलिस ठाण्याचे विठ्ठल फुसे, युनूस शेख आदी या वेळी उपस्थित होते.  

हेही वाचा > ३० क्विंटल कांदा घेऊन तोतया व्यापारी फरारी; कधी थांबणार शेतकऱ्याची फसवणूक?