रेल्वेच्या 'त्या' आयसोलेशन ट्रेन्स आता गेल्यात कुठे ? धक्कादायक माहिती समोर

isolation trains 1.jpg
isolation trains 1.jpg

नाशिक : नाशिक रोड रेल्वेने मोठा गाजावाजा करीत कोरोनाच्या संकटप्रसंगी आयसोलेशन ट्रेनची निर्मिती केली होती. कोरोनाबाधितांसाठी बेडची कमतरता पडल्यास या ट्रेनचा वापर केला जाणार होता. आता नाशिक शहरात रुग्णसंख्या वाढत असून, बेडची कमतरता भासत आहे. परंतु आता रेल्वेच्या त्या आयसोलेशन ट्रेन्स गेल्यात कुठे, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

धक्कादायक प्रकार समोर
नाशिकमधून परराज्यांत जाणाऱ्या व परराज्यांतून नाशिक रोड रेल्वेस्थानकात येणाऱ्या प्रवाशांची काळजी सध्या महापालिका घेत आहे. रेल्वेचे सुश्रुषा केंद्र असूनही रेल्वेचे आरोग्य विभागाचे कर्मचारी प्रवाशांना आरोग्य सेवा देत नसल्याच्या तक्रारी आहेत. रेल्वेने तयार केलेल्या आयसोलेशन ट्रेनही श्रमिक ट्रेन म्हणून वापरल्या गेल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रुग्णसंख्या वाढल्यास रेल्वेने आयसोलेशन वॉर्ड तयार केले होते. इमर्जन्सी हॉस्पिटल रेल्वेतच सुरू करणार असल्याचे मार्केटिंगही जोरात झाले होते. रेल्वेतच अद्ययावत रुग्णालय उघडणार, त्याचप्रमाणे रेल्वेची रुग्णालये कोरोना रुग्णांसाठी वापरणार, असे जाहीर केले होते. मात्र त्यापैकी एकही उपयोगात येत नसल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे रेल्वेचे नियोजन हवेतच विरले की काय, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक! "निसर्गा'ने केली आई-मुलाची ताटातूट...रात्रभर बछडा आईची वाट बघत होता

भुसावळला ट्रेन पडून 
भुसावळ डिव्हिजनअंतर्गत येणाऱ्या रेल्वेस्थानकांवर काही ट्रेन त्याच जागी उभ्या आहेत. लाखो रुपये खर्चून ट्रेनमध्ये वैद्यकीयदृष्ट्या अद्ययावत केलेल्या बदलांचा खर्च वाया गेल्याची प्रतिक्रिया जाणकार व्यक्त करीत आहेत. दरम्यान, नाशिक रोड रेल्वेस्थानकात प्रवेश करताना सॅनिटायझरची सोय नाही. पुरेशा प्रमाणात थर्मल स्क्रीनिंग मशिन नाही. रेल्वेचा ओपीडी कक्ष असून, प्रवासी स्थानकात प्रवेश करतेवेळी रेल्वेचे वैद्यकीय पथक सेवा देत नसल्याच्या तक्रारी आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com