तेरा सापळे.. ड्रोनची नजर... तरीही त्या नरभक्षकाची हुलकावणीच! 

leopard night 1.jpg
leopard night 1.jpg

तेरा सापळे, ड्रोनला बिबट्याची हुलकावणी 

नाशिक : शेवगेदारणा येथील समृद्धी कासारला तिच्या आजीने त्याच्या हल्ल्यातून सहीसलामत वाचविले. माणसाचे रक्त तोंडी लागलेल्या नरभक्षकाला जेरबंद अथवा ठार करण्याची मागणी या भागात वाढली आहे.

तेरा सापळे.. ड्रोनची नजर... तरीही त्या नरभक्षकाची हुलकावणीच!

दारणेच्या काठावर असलेल्या दोनवाडे शिवारात रुद्र शिरोळे (वय 5) व जीवराम ठुबे (76), हिंगणवेढे येथील कुणाल पगारे (11) व बाभळेश्‍वर येथे तीन वर्षांची चिमुरडी बिबट्याच्या हल्ल्यात बळी गेली. शेवगेदारणा येथील समृद्धी कासारला तिच्या आजीने बिबट्याच्या हल्ल्यातून सहीसलामत वाचविले. माणसाचे रक्त तोंडी लागलेल्या नरभक्षक बिबट्याला वन विभागाने जेरबंद अथवा ठार करण्याची मागणी या भागात वाढली आहे. त्यानुसार वन विभागाने पथक आणून या भागात शोध सुरू आहे. पण बिबट्याने अद्याप एकाही सापळ्याला प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे चार-पाच दिवसांपासून बिबट्याच्या मागावर असलेले बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पथक थकले पण बिबट्या काही सापडेना. 

तेरा पिंजऱ्यांना हुलकावणी 
 नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने बाभळेश्‍वर शिवारात ५ , मोह येथे एक, पळसेला एक, शिंदेला एक, दोनवाडे शिवारात ३ , तसेच देवळाली कॅम्पला एक असे एकूण 13 पिंजरे लावले आहेत. बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे पशुवैद्यकीय अधिकाऱयासह नाशिक पश्‍चिम विभागाच्या दोन पथकांनी बिबट्याला शोधण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याची मदत घेतली, मात्र तीन दिवसांत बिबट्याला शोधण्यासाठी यश न आल्यानंतर अखेर बोरीवली येथील पथक रिकाम्या हाताने माघारी फिरले यापूर्वी पिंजऱ्यात अडकून बाहेर पडल्यामुळे बिबट्या सहसा पुन्हा पिंजऱ्यात जात नसल्याने दारणा खोऱ्यातील 13 सापळ्यांना हुलकावणी 
शिवारात संचार करीत आहेत. 

जागते रहो! 
बिबट्याच्या दहशतीचा शेतीकामांवर परिणाम झाला आहे. रात्री गायी, म्हशी, वासरांच्या सुरक्षेसाठी शेतकऱ्यांना जागता पहारा द्यावा लागतो. घराबाहेर पडणे धोकादायक झाले आहे. बिबट्या सापळ्यात कधी एकदा अडकतोय याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली

अखेर पथक माघारी फिरले

दारणेच्या पूर्वेकडील गावात तीन बळी घेणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी दोनवाडेपासून बाभळेश्‍वरपर्यंत तब्बल 13 ठिकाणी सापळे लावले. ड्रोन कॅमेऱ्यांच्या मदतीने शोध सुरू आहे. तीन दिवसांपासून तळ ठोकून असलेले बोरीवली (मुंबई) येथील थकलेले पथक माघारी फिरले पण बिबट्या काही सापडला नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com