esakal | इगतपुरीच्या ३०० फूट खोल दरीत तब्बल ११ तासांचा थरार! अखेर रेस्क्यू टिमच्या प्रयत्नांना यश 
sakal

बोलून बातमी शोधा

igatpuri valley.jpg

नाशिकमध्ये इगतपुरी-मायंदरी दरीतील ११ तासांचा थरारक प्रसंग पाहायला मिळाला. नाशिक रेस्क्यू टीमला मंगळवारी (ता. १६) रात्री इगतपुरी पोलिस ठाण्याकडून माहिती मिळाली. आणि टीम तत्क्षणी घटनास्थळी रवाना झाली. काय घडले पुढे...

इगतपुरीच्या ३०० फूट खोल दरीत तब्बल ११ तासांचा थरार! अखेर रेस्क्यू टिमच्या प्रयत्नांना यश 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिकमध्ये इगतपुरी-मायंदरी दरीतील ११ तासांचा थरारक प्रसंग पाहायला मिळाला. नाशिक रेस्क्यू टीमला मंगळवारी (ता. १६) रात्री इगतपुरी पोलिस ठाण्याकडून माहिती मिळाली. आणि टीम तत्क्षणी घटनास्थळी रवाना झाली. काय घडले पुढे...

इगतपुरीच्या ३०० फूट खोल दरीत तब्बल ११ तासांचा थरार!

नाशिक रेस्क्यू टीमला मंगळवारी (ता. १६) रात्री इगतपुरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक दीपक पाटील यांनी माहिती दिली.नाशिक रेस्क्यू टीमचे दयानंद कोळी, संतोष जगताप, सुमीत पंडित, ओम उगले, संकेत क्षीरसागर, भीमा शंकर सहाने, नीलेश पवार, आदी येथे एकत्र येत मायंदरीकडे गेले. तेव्हा त्यांनी पाहिले की, महिलेचे पाय दोन विशाल दगडांच्या आत अडकलेले होते. संपूर्ण कातळ असलेल्या दरीत आर्टिफिशल अँकर करण्याशिवाय पर्याय नसल्याने त्यापद्धतीचे अँकर करण्यात आले. वरचा बेस संतोष जगताप यांनी सांभाळत इतर सदस्यांनी संवादकाची भूमिका व अन्य महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. सुमीत, ओम व विशाल हे तिघे साहित्यासह दरीत उतरले. साधारण तीनशे फूट खोल दरीत महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. त्यात महिलेचे पाय दोन विशाल दगडांच्या आत अडकलेले होते. तिघांनी अथक प्रयत्नांनंतर दगड बाजूला करीत मृतदेह प्लॉस्टिकमध्ये गुंडाळत पुलिंग केला.

हेही वाचा - सिव्हील हॉस्पीटलमधून बालिका अपहरण प्रकरणी अपहरणकर्त्याकडून खुलासा! वेगळेच सत्य समोर

तीनशे फुट दरीत आढळला मृतदेह

इगतपुरी-मायंदरी येथील दरीत नऊ दिवसांपासून असलेला ३५ वर्षीय महिलेचा मृतदेह नाशिक रेस्क्यू टीम, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व शहापूर आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाने ११ तासांच्या प्रयत्नांनंतर गुरुवारी (ता. १७) बाहेर काढला. मृतदेह वरती आणण्यात पथकाला यश आले. विच्छदेनासाठी मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. मानवेढे (ता. इगतपुरी) येथील मीता अशोक वीर असे मृत महिलेचे नाव असून, ती तब्बल दहा दिवसांपासून दरीत असल्याची माहिती या वेळी देण्यात आली. स्थानिकांनी दोन दिवस प्रयत्न केले, मात्र यश न आल्याने नाशिक रेस्क्यू टीमला बोलविण्यात आले होते. 

go to top