भक्तांनो...यंदा गणेशमूर्तींच्या किंमतीतही वाढ शक्य..हे आहे कारण

ganesh-utsav.png
ganesh-utsav.png

नाशिक : लाडक्‍या गणरायाचे आगमन अवघ्या दीड महिन्यावर येऊन ठेपल्याने मूर्ती कारागीर शेवटचा हात फिरवण्याच्या कामात मग्न आहेत. या वर्षी कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाउनचा फटका मूर्तिकारांनाही बसला आहे. कच्चा माल तसेच रंगांच्या किमती वाढल्याने त्याचा परिणाम गणेशमूर्तींच्या किमतीवरही होणार आहे. त्यामुळे या वर्षी गणेशमूर्तींच्या किमती २० ते २५ टक्के वाढण्याची शक्‍यता निर्माण आहे. 

मूर्तिकार छोट्या मूर्ती बनविण्यावरच जास्त भर
येत्या २२ ऑगस्टला गणरायाचे आगमन होणार आहे. या वर्षी गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असेल. सार्वजनिक गणेश मंडळे अतिशय साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करणार आहेत. दर वर्षीप्रमाणे यंदा उत्साह पाहायला मिळणार नाही. मूर्तिकार छोट्या मूर्ती बनविण्यावरच जास्त भर देत आहेत. तीन फुटांपेक्षा कमी उंचीच्या मूर्तीच या वेळी बनविल्या जात आहेत. येथील मूर्तिकार दर वर्षी परराज्यातही मूर्ती पाठवत असे. कोरोनामुळे यंदा परराज्यातून येणाऱ्या ऑर्डर रद्द झाल्या आहेत. गणेशमूर्तींसाठी लागणारी पीओपीची बॅग आधी १५० रुपयांना मिळत होती. लॉकडाउनमुळे त्यात भाववाढ होऊन ती २५० रुपयांना घ्यावी लागत होती. लॉकडाउनच्या काळात रंगाचे कारखाने बंद असल्याने रंग दुप्पट भावाने खरेदी करावा लागत आहे. परिणामी मूर्ती बनविण्यासाठीच्या खर्चात वाढ झाली आहे. शाडूची बॅग २५० रुपयांना मिळत होती, त्याची किंमत चारशे रुपयांपर्यंत वाढल्याने त्याचाही फटका बसला आहे. 

कच्च्या मालाच्या किमती वाढल्याचा परिणाम 

दर वर्षी आम्ही परराज्यातही गणेशमूर्ती पाठवतो. या वर्षी कोरोनामुळे परराज्यातून मागणी घटली आहे. लॉकडाउनमुळे गणेशमूर्तिसाठी लागणारा कच्चा माल जास्त भावात घ्यावा लागला. त्यामुळे यावर्षी मूर्तींच्या किमतीत २० ते २५ टक्के वाढ होण्याची शक्‍यता आहे. - संदेश मोरे, मूर्तिकार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com