दुर्दैवी : सलग चार वर्षे द्राक्षाचे उत्पन्नच नाही; बेपत्ता शेतकऱ्याच्या आत्महत्येचा खुलासा

प्रमोद सावंत
Saturday, 10 October 2020

५ सप्टेंबरला नानाभाऊ शेलार घरी कोणाला काही न सांगता निघून गेले होते. ६ सप्टेंबरला कुटुंबीयांनी त्यांच्या बेपत्ता झाल्याची नोंद तालुका पोलिस ठाण्यात केली होती.

नाशिक / मालेगाव : नैराश्‍यातून येसगाव खुर्द येथील नानाभाऊ चिंधा शेलार (वय ५२) या शेतकऱ्याने संगीता पाटील यांच्या शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी (ता. ९) सकाळी हा प्रकार उघड झाला. गेल्या महिनाभरापासून शेलार बेपत्ता होते. 

बेपत्ता शेतकऱ्याच्या आत्महत्येचा खुलासा
५ सप्टेंबरला नानाभाऊ शेलार घरी कोणाला काही न सांगता निघून गेले होते. ६ सप्टेंबरला कुटुंबीयांनी त्यांच्या बेपत्ता झाल्याची नोंद तालुका पोलिस ठाण्यात केली. पाटील यांच्या शेतातील मजूर मका कापणी करत असतानाच झाडाला गळफास घेत लटकलेले शेलार त्यांना दिसून आले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. निंबाचे झाड मक्याच्या शेतात असल्याने व मका मोठ्या प्रमाणावर वाढल्याने तसेच सलग पाऊस सुरू असल्याने शेताकडे कोणीही फिरकले नाही. त्यामुळे हा प्रकार लक्षात आला नाही.

हेही वाचा > आता नाशिक-मुंबई प्रवास केवळ अडीच तासांवर! उद्योग व्यवसायाला मिळणार मोठी चालना 

सलग चार वर्षे द्राक्षाचे उत्पन्नच नाही

आत्महत्येला मोठा कालावधी उलटल्याने उर्वरित मृतदेह कुजल्याचा संशय पोलिस व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. या प्रकरणी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. शेलार यांची येसगाव खुर्द शिवारात अवघी पावणेदोन एकर जमीन होती. यातील दीड एकर क्षेत्रात द्राक्षे होती. सलग चार वर्षे द्राक्षाचे उत्पन्नच न आल्याने ते हवालदिल झाले होते. 

हेही वाचा > आठशे सीसीटीव्हीतून शहर नजरेच्या एकाच टप्प्यात! कमांड कंट्रोल सेंटर सज्ज

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yesgaon Khurd Farmer's suicide nashik marathi news