esakal | युवा नेत्याचे अलिशान कारचे स्वप्न भंगले! स्वप्न भंगाच्या सुरस कथेची परिसरात चर्चा
sakal

बोलून बातमी शोधा

sakal - 2021-02-26T095244.980.jpg

युवा नेत्याचे अलिशान कारचे स्वप्न भंगले. हे प्रकरणही तेवढेच मजेशीर आहे. एका कोट्यधीश व्यक्तीला लाखो रुपये किंमत असलेली चारचाकी अलिशान गाडी घ्यायची होती. पण त्यावेळी असे काही घडले ज्यामुळे महागड्या गाडीचे स्वप्न बघणाऱ्या एका युवा राजकीय नेत्याला रिकाम्या हाताने माघारी फिरावे लागले. या राजकीय युवा नेत्याचे स्वप्न भंगाच्या सुरस कथा सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरल्या आहेत.

युवा नेत्याचे अलिशान कारचे स्वप्न भंगले! स्वप्न भंगाच्या सुरस कथेची परिसरात चर्चा

sakal_logo
By
प्रमोद दंडगव्हाळ

सिडको (नाशिक) : युवा नेत्याचे अलिशान कारचे स्वप्न भंगले. हे प्रकरणही तेवढेच मजेशीर आहे. एका कोट्यधीश व्यक्तीला लाखो रुपये किंमत असलेली चारचाकी अलिशान गाडी घ्यायची होती. पण त्यावेळी असे काही घडले ज्यामुळे महागड्या गाडीचे स्वप्न बघणाऱ्या एका युवा राजकीय नेत्याला रिकाम्या हाताने माघारी फिरावे लागले. या राजकीय युवा नेत्याचे स्वप्न भंगाच्या सुरस कथा सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरल्या आहेत. 
 

राजकीय युवा नेत्याचे स्वप्न भंगाची सुरस कथा
एखाद्या गोष्टीसाठी सर्वसामान्य व्यक्तींना बँकेतून कर्ज काढताना तारेवरची कसरत करावी लागते. हा अनुभव बहुतांश लोकांना नेहमी आलेला असतो. त्यात काही फार वेगळ सांगण्यासारखे नाही. परंतु, जेव्हा तुमची कोट्यवधीची प्रॉपर्टी असते, तेव्हा मात्र बँकेवाले अक्षरशः कर्ज घ्या... म्हणत तगादा लावताना दिसतात.. एवढं मात्र खरं! बँकेचे अधिकारी व एजंट कर्ज देताना वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीमही सांगून पटवताना आपणास नेहमी दिसतात. परंतु, एका बँकेने तर अशाच एका प्रकरणात हद्दच केली आहे. हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. कारण प्रकरणही तेवढेच मजेशीर आहे. एका कोट्यधीश व्यक्तीला लाखो रुपये किंमत असलेली चारचाकी अलिशान गाडी घ्यायची होती. त्यासाठी त्यांनी बँकेला कर्ज घेण्यासाठी फाइलही दिली. त्यानंतर त्या बँकेने ती फाइल तपासली आणि ‘तुम्हाला नाही मग कोणाला कर्ज द्यायचे’ असे सांगून तुम्ही गाडी फायनल करा आम्ही तुम्हाला कर्ज देण्यास तयार आहोत, असे मोघम सांगितले. त्या भरवशावर त्या महोदयांनी गाडी घेण्याची तयारी सुरू केली आणि भावाला विमानाने जयपूर येथे गाडी घेण्यास पाठवले. पण त्यानंतर...

हेही वाचा - अवघ्या चारच दिवसांवर बहिणीचं लग्न अन् लग्नघरातूनच निघाली अंत्ययात्रा; दुर्दैवी घटना

...आणि अलिशान कारचे स्वप्न भंगले

त्यानंतर लगेच बँकेचा फोन आला आणि आपणास कर्ज मिळणार नाही ‘सॉरी’ म्हणून सांगितले. तेव्हा त्या व्यक्तीला ४४० चा होल्ट बसला. यावर बँक अधिकारी व त्यांच्यामध्ये चांगलीच खडाजंगी झाली. कारण बँकेचे खातेदार होण्यासाठी तुम्ही आम्हाला आग्रह धरला. तुम्हाला केव्हाही कर्ज मिळेल म्हणून सांगितले. त्याकरता आम्ही बँकेत कोट्यवधी रुपयांच्या ठेवी ठेवल्या, असे असताना अचानकपणे ‘भरवशाच्या म्हशीला टोणगा’ या म्हणीप्रमाणे ऐनवेळी कर्ज देण्यास नकार दिला. 

हेही वाचा - ५० फूट खोल विहीर, आत ७३ वर्षांच्या आजी; दैवच बलवत्तर दुसरे काय! 

राजकीय पार्श्‍वभूमीमुळे स्वप्नभंग 
या प्रकाराबद्दल त्या महोदयांनी हे योग्य नाही, असे सांगितले. परंतु, बँकवाले काही ऐकायला तयार नव्हते. त्यावर त्या महोदयांनी अर्ज नामंजूर करण्याचे कारण तरी सांगा, असे वैतागून विचारले. एका अधिकाऱ्याने सांगितले, की तुमचे सिबिल रेकॉर्ड कमी आहे. तर, दुसऱ्या एका अधिकाऱ्याने तुमची राजकीय पार्श्वभूमी असल्याने आम्ही तुम्हाला कर्ज देऊ शकत नाही, असे सांगितले. हे ऐकून अलिशान गाडीचे स्पप्न बघणाऱ्या त्या महोदयांना आश्‍चर्याचा धक्काच बसला. गाडी घेण्याचे त्यांचे स्वप्न भंगल्याचा प्रकार सध्या चांगला चर्चिला जात आहे.  

रिकाम्या हाताने माघारी फिरावे लागले

कर्जाच्या भरवशावर परराज्यात अलिशान गाडी घेण्यास गेले अन्‌ ऐनवेळी बँकेने कर्ज देण्यास नकार दिल्याने महागड्या गाडीचे स्वप्न बघणाऱ्या एका युवा राजकीय नेत्याला रिकाम्या हाताने माघारी फिरावे लागले.