चालकाच्या डोळ्यादेखत घडत होता तरुणाच्या मृत्यूचा थरार! थरारक प्रसंग

अरुण खंगाळ
Monday, 16 November 2020

गोकुळ पिंपळे त्याचा ट्रॅक्टर घेऊन रोडने भरधाव वेगाने जात होते. त्यावेळी त्याच्यासोबत ट्रॅक्टरवर त्याच्या शेजारी बसलेला वय १७ वर्षांचा तरुण. त्यावेळी त्याच्यासोबत जे काही घडले तो प्रसंग थरारक होता. काय घडले नेमके?

लासलगाव (जि.नाशिक) : गोकुळ पिंपळे त्याचा ट्रॅक्टर घेऊन रोडने भरधाव वेगाने जात होते. त्यावेळी त्याच्यासोबत ट्रॅक्टरवर त्याच्या शेजारी बसलेला वय १७ वर्षांचा तरुण. त्यावेळी त्याच्यासोबत जे काही घडले तो प्रसंग थरारक होता. काय घडले नेमके?

चालकाच्या डोळ्यादेखत घडत होता तरुणाच्या मृत्यूचा थरार! 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी (ता. १३) गोकुळ बन्सी पिंपळे (रा. सारोळेथडी) यांचा ट्रॅक्टर (एमएच २०, एवाय ७५६४) माळी वस्तीच्या जुन्या नांदूरमध्यमेश्वर रोडने भरधाव जाताना तो पाटात उलटला. त्या वेळी त्याच्यासोबत ट्रॅक्टरवर त्याच्या शेजारी बसलेला अजय गोरख बर्डे (वय १७) हा तरुण ट्रॅक्टरखाली दबल्याने त्याच्या छातीला मार लागून तो मृत झाला. तसेच चालक पिंपळे अपघातात जखमी झाला आहे. अजय बर्डे याचा चुलतभाऊ नाना बर्डे यांच्या फिर्यादीवरून गोकुळ पिंपळे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. 

हेही वाचा > विवाहितेच्या अंगावरील स्त्रीधन काढून अपहार प्रकरणी गुन्हा दाखल 

ट्रॅक्टरखाली दबल्याने सारोळेथडीत युवकाचा मृत्यू 

नांदूरमध्यमेश्वरकडून सारोळेथडी गावाकडे जाणारा ट्रॅक्टर उलटल्याने ट्रॅक्टरखाली सापडून एका तरुणाचा मृत्यू झाला. याबाबत लासलगाव पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे.

हेही वाचा > अरेच्चा! लासलगावचा कांदा ‘कौन बनेगा करोडपती’वर; लासलगावचे नाव पुन्हा प्रकाशझोतात 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young man dies under a tractor nashik marathi news