ब्रेकिंग! पोहायला गेलेल्या तरुणाचा किशोरसागर धरणात बुडून मृ्त्यू

मोठाभाऊ पगार
Sunday, 4 October 2020

रामेश्वर ता.देवळा जवळील किशोरसागर धरणात पोहायला गेलेल्या तीन मित्रांपैकी आज रविवार (ता.४) रोजी दुपारी एकाचा बुडून मृत्यू झाला. मृतदेह शोधण्यासाठी पोलिसांचे शोधकार्य चालू आहे.

नाशिक/ देवळा : रामेश्वर ता.देवळा जवळील किशोरसागर धरणात पोहायला गेलेल्या तीन मित्रांपैकी आज रविवार (ता.४) रोजी दुपारी एकाचा बुडून मृत्यू झाला. मृतदेह शोधण्यासाठी पोलिसांचे शोधकार्य चालू आहे.

 

सरस्वतीवाडी ता.देवळा येथील तीन मित्र रामेश्वरजवळील या जलाशयात पोहोण्यासाठी आले असता त्यातील केशव उर्फ राज आहिरे (वय २३) याचा बुडून मृत्यू झाला. हे धरण पूर्ण क्षमतेने भरले असून जेथे हा तरुण बुडाला तेथे मृतदेहाचे शोधकार्य सुरू आहे. तालुक्यातील दहिवडनजीक असलेल्या चोरचावडी धबधब्याच्या जलाशयात वडाळीभोई ता. चांदवड येथील दोन युवकांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेला एक महिनाही झाला नाही तोच ही घटना घडल्याने नागरिकांत हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

(सविस्तर वृत्त थोड्याच  वेळात)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: young man drowned in a dam nashik marathi news

Tags
टॉपिकस
Topic Tags: