प्रियकर म्हणे...'आपलं लग्न होऊ शकत नाही'...अन् त्यावर तिचा 'असा' धक्कादायक प्रकार!

breakup.jpg
breakup.jpg
Updated on

नाशिक : प्रेम झालं, आयुष्याची स्वप्न रंगवली...त्यात रंग भरण्यासाठी लग्नाचा विषय समोर आला...आणाभाकांना भेद पडला...प्रियकरानं माझी आता आर्थिक परिस्थिती नाही, असे सांगत लग्नाला नकार दिला. प्रियकराचा नकार मिळताच प्रियसीने स्वत:ला केलं बंदिस्त; आपला निर्णय पोलिसांना कळविला; निर्भया पथकाने अन्नत्यागकर्तीचे घर गाठले...हा प्रकार घडला, तो मुंबई नाका परिसरात. 

अशी आहे घटना

मुंबई नाका परिसरातील 19 वर्षीय युवतीने राहत्या घरातच स्वत:ला एका खोलीत कोंडून घेत अन्नत्याग सुरू केले होते. कारण होते प्रेमभंग. तीन दिवसांपासून ती मुंबई नाका पोलिसांशी संपर्क साधून होती. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांनी याची दखल घेत, त्याची माहिती निर्भया पथकाला दिली. त्यानुसार निर्भया पथकाच्या महिला पोलिस उपनिरीक्षक नेहा सूर्यवंशी व त्यांचे पथक मुंबई नाका पोलिसांत दाखल झाले. संबंधित युवतीच्या पत्ता घेत घर गाठले. तिचे परिसरातच राहणाऱ्या आणि तिच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या युवकाबरोबर प्रेम जुळले होते. मात्र तिने लग्नासंदर्भात त्याच्याकडे विचारणा केली असता, त्याने नकार दिला आणि प्रेमसंबंधही संपुष्टात आणले. त्यामुळे प्रेमभंग झाल्यामुळे अन्नत्याग आणि आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असल्याचे तिने सांगितले. 

आर्थिक परिस्थिती नसल्याने लग्नाला नकार

उपनिरीक्षक सूर्यवंशी यांनी माहिती जाणून घेत तिचे समुपदेशन करीत समजून घातली. तसेच, तिच्या प्रियकराशी बोलण्याचे आश्‍वासन देत तिला अन्नग्रहण करण्यास दिले. त्यानंतर निर्भया पथकाने तिच्या प्रियकरालाही चौकशीसाठी बोलावले. त्याने घरची आर्थिक परिस्थिती नसल्याने लग्नाला नकार दिल्याचे सांगितले. तसेच प्रेम करताना ही बाब प्रकर्षाने लक्षात न आल्याचीही कबुली त्याने दिली. याप्रकरणी दोघांना मुंबई नाका पोलिसांत पुन्हा बोलाविण्यात आले. दोघांचे समुपदेशन करण्यात आल्यानंतर शुक्रवारी (ता.12) तिला तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. निर्भया पथकाने वेळीच केलेल्या समुपदेशनामुळे प्रेमभंग झालेल्या युवतीने अन्नत्यागाचा निर्णय मागे घेतला.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com