सुशांतसिंग राजपूतचे स्टेट्स ठेवत जगाला केले बाय बाय; भाऊबीजेच्या दिवशी ह्रदयद्रावक घटना

गोपाळ शिंदे
Thursday, 19 November 2020

‘कोणाचे दु:ख कोणी समजू शकत नाही, सहन करणाऱ्यास ते माहीत...’, असा भावनिक संदेश शेअर केला. आणि मनातले दु:ख मनातच ठेवून सोपानने निर्णय घेतला.

घोटी (नाशिक) : सायंकाळी सातला त्याने व्हॉट्सॲप स्टेट्सवर त्याने सुशांतसिंगचे छायाचित्र व त्यावर ‘कोणाचे दु:ख कोणी समजू शकत नाही, सहन करणाऱ्यास ते माहीत...’, असा भावनिक संदेश शेअर केला. आणि मनातले दु:ख मनातच ठेवून सोपानने निर्णय घेतला. या घटनेने कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.

ऐन भाऊबीजेच्या दिवशीच ह्रदय पिळवटून टाकणारी घटना

सोपान पोपट चव्हाण (वय २२) असे या तरुणाचे नाव असून, त्याने कौटुंबिक कारणातून आत्महत्या केली आहे. सायंकाळी सातला त्याने व्हॉट्सॲप स्टेट्सवर त्याने सुशांतसिंगचे छायाचित्र व त्यावर ‘कोणाचे दु:ख कोणी समजू शकत नाही, सहन करणाऱ्यास ते माहीत...’, असा भावनिक संदेश शेअर केला. त्यानंतर साडेसातला रेल्वेखाली आत्महत्या केली.  

हेही वाचा > मोकाट कुत्र्याच्या तावडीत इवलेसे बिथरलेले पाडस; युवकांनी दिले जीवदान

दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूतचे छायाचित्र ठेवले

व्हॉट्सॲप स्टेट्सवर दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूतचे छायाचित्र ठेवत माणिखांब (ता. इगतपुरी) येथील युवकाने ऐन भाऊबीजेच्या दिवशी, सोमवारी (ता. १६) सायंकाळी साडेसातला धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केली. 
या घटनेने गावात शोककळा पसरली असून, घोटी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा > मामाने वाचवले पण नियतीने हिरावले! चिमुकल्या जयाची मृत्युशी झुंज अपयशी

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: youth commits suicide after Sushant Singh keeping status nashik marathi news