ह्रदयद्रावक! लक्ष्मीपूजन आटोपले आणि वैभवची जीवनयात्राही आटोपली; ऐन दिवाळीत कुटुंबाच्या आनंदावर नियतीचा घाला

विनोद बेदरकर
Monday, 16 November 2020

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर स्रवत्र उत्साहाचे आणि आनंदाचे वातवरण आहे. लॉकडाऊनमध्ये एकमेकांना भेटू शकत नसलेले कुटुंबिय आता या निमित्ताने भेटू लागले आहेत. दुरावा आता कुठे तरी कमी होऊ लागला आहे. अशातच हगवणे कुटुंबियात देखील आनंद होता. मात्र...

नाशिक रोड : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर स्रवत्र उत्साहाचे आणि आनंदाचे वातवरण आहे. लॉकडाऊनमध्ये एकमेकांना भेटू शकत नसलेले कुटुंबिय आता या निमित्ताने भेटू लागले आहेत. दुरावा आता कुठे तरी कमी होऊ लागला आहे. अशातच हगवणे कुटुंबियात देखील आनंद होता. मात्र एका क्षणात त्यांच्या आनंदावर नियतीचा घाला आला आणि आनंदाचे रुपांतरण चक्क ह्रदय पिळवटून टाकणाऱ्या आक्रोश मध्ये झाले. काय घडले नेमके? 

घरचे लक्ष्मीपूजन आटोपले आणि जीवनयात्राही आटोपली

विहितगाव येथील वैभव रमेश हगवणे (वय २२) दिवाळीत कुटुंबियासमवेत दिवाळी साजरी करत होता. त्यांनी एकत्र मिळून लक्ष्मीपूजनही केले. पण त्यानंतर अचानक काही गोष्टी झपाट्याने बदलणार आहेत. याचा कोणालाही अंदाज नव्हता.  घरचे लक्ष्मीपूजन आटोपल्यानंतर शनिवारी (ता. १४) रात्री साडेअकराच्या सुमारास दुचाकीवरून जात असताना वैभवचा अपघात झाला. त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेले असता, डाॅक्टरांनी तपासून मृत घोषित केले. 

हेही वाचा > विवाहितेच्या अंगावरील स्त्रीधन काढून अपहार प्रकरणी गुन्हा दाखल 

तिथे आता फक्त दु:खाचे सावट

२२ वर्षांच्या तरुण मुलाच्या अचानक जाण्याने कुटुंबिय व गावात शोककळा पसरली. ऐन दिवाळीतच जिथे आनंदाचे वातावरण असते तिथे आता फक्त दु:खाचे सावट आहे.

हेही वाचा > अरेच्चा! लासलगावचा कांदा ‘कौन बनेगा करोडपती’वर; लासलगावचे नाव पुन्हा प्रकाशझोतात 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth dies in accident at Vihitgaon nashik marathi news