esakal | हाऊज द जोश! जीव धोक्यात घालून तरुणांचा चक्क महामार्गावर सराव; युवा वर्गासाठी ठरताएत प्रेरणादायी
sakal

बोलून बातमी शोधा

youth practice.jpg

मनात जिद्द आणि तीव्र इच्छाशक्ती असल्यास मनुष्य हवे ते साध्य करू शकतो. मग त्यासाठी विविध कारणे किंवा नशिबाला दोष देत बसत नाही. अशीच काहीशी परिस्थिती चांदोरीसह पंचक्रोशीत दिसत आहे. भल्यापहाटे नाशिक-औरंगाबाद महामार्गावर सैन्य, पोलिस दलात सहभागी होण्यासाठी तरुण सराव करत आहेत.

हाऊज द जोश! जीव धोक्यात घालून तरुणांचा चक्क महामार्गावर सराव; युवा वर्गासाठी ठरताएत प्रेरणादायी

sakal_logo
By
सागर आहेर

नाशिक / चांदोरी : मनात जिद्द आणि तीव्र इच्छाशक्ती असल्यास मनुष्य हवे ते साध्य करू शकतो. मग त्यासाठी विविध कारणे किंवा नशिबाला दोष देत बसत नाही. अशीच काहीशी परिस्थिती चांदोरीसह पंचक्रोशीत दिसत आहे. भल्यापहाटे नाशिक-औरंगाबाद महामार्गावर सैन्य, पोलिस दलात सहभागी होण्यासाठी तरुण सराव करत आहेत. फक्त मैदानाअभावी हे तरुण आपला जीव धोक्यात घालून महामार्गालाच मैदान समजून सराव करत आहेत. खेळाचे मैदान नाही, कोणीही मार्गदर्शक नाही; पण तरीही आपल्या भविष्याचे लक्ष्य निश्चित करून नाशिक-औरंगाबाद महामार्गावर सराव करणारे युवक इतर युवा वर्गासाठी प्रेरणादायी ठरत आहेत. 

मैदानाअभावी महामार्गावर तरुणांचा सराव 
चांदोरीत खेळण्यासाठी व शारीरिक कसरतसाठी विद्यार्थ्यांना चांगले व सुखसुविधा असलेले मैदान उपलब्ध नाही. पोलिस किंवा सैन्यदलात जाऊन देशसेवा करण्याची उर्मी मनात असल्याने पंचक्रोशीतील अनेक युवकांनी हार न मानता गावातून जाणाऱ्या चारपदरी नाशिक-औरंगाबाद महामार्गाला सरळ मैदान समजून त्यांनी सराव सुरू केला.

हेही वाचा > हाउज द जोश : 69 वर्षीय 'आजी'ने हरिहर किल्ला केला सर; तोही अवघ्या चार तासांत! पाहा VIDEO

संपादन - ज्योती देवरे